Amalner

?️ Big Breaking…अमळनेर ची स्थिती अत्यंत वाईट..लोकांचा बेशिस्तपणा आणि ठिसाळ प्रशासनाने केला घात…

अमळनेर ची स्थिती अत्यंत वाईट..नाबाद 210.. लोकांचा बेशिस्तपणा आणि ठिसाळ प्रशासनाने केला घात…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर येथे आज पुन्हा 34 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून 31जण संपर्कातील आहेत तर आणि 3 नवीन रुग्ण आहेत. ही बाब चिंताजनक असून लोकांनी सावधानता बाळगावीअसे आवाहन ठोस प्रहारच्या वतीने
करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जनता खबरदारी घेण्यास तयार नाही.आज शहरात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती की जणू लोकांना कपडे मोबाईल ,भाजी किरणा इतर वस्तु आयुष्यात कधीच मिळाल्या नाहीत.अमळनेर करांनी बेशिस्तपणा चे उत्तम उदा घालून दिले आहे. दुकानदार तर काय फक्त पैसा पाहत आहे. आणि अमळनेर इतके ढिसाळ प्रशासन कुठेच पहावयास मिळणार नाही या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ होय.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button