Bollywood

Bollywood: कंगना राणावत अभिनित इमर्जन्सीचा टीझर रिलीज… कंगनाचा दमदार अभिनय…

Bollywood: कंगना राणावत अभिनित इमर्जन्सीचा टीझर रिलीज… कंगनाचा दमदार अभिनय…

इमर्जन्सी हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर कोणत्या कलाकार यामध्ये दिसणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या चित्रपटात मिलिंद सोमण, अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या टीझरची सुरुवात ही २५ जून १९७५ सालाने होते. अनेकजण पोलिसांवर दगड फेक करताना दिसत आहेत. त्यावर पोलीस देखील लाठीचार करुन सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. हा सगळ्या प्रकाराचा फोटो वृत्तपत्रामध्ये छापून येतो आणि त्यावर भारतात इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे असे लिहिण्यात आले आहे. दुसरीकडे जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणारे अनुपम खेर हे जेलमध्ये आहेत. ते म्हणतात, ‘भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट काळ आला आहे. सरकार राज नाही तर अहंकार राज आहे. हा आमचा नाही तर देशाचा मृत्यू आहे. हे तणावाचे वातावरण थांबवायला हवे.’

सध्या सोशल मीडियावर ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. अनेक नेटकऱ्यांनी कंगनाच्या या चित्रपटाचे कौतुक केले आहे. प्रेक्षक आता इमर्जन्सीच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

‘इमर्जन्सी’ हा एक पीरियड ड्रामा आहे. यामध्ये २५ जून १९७५ रोजी देशात सुरू झालेली आणीबाणीची परिस्थिती दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करणार आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button