Amalner

Amalner:  मराठा समाजाच्या आरक्षणास राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा जाहीर पाठींबा…

Amalner: मराठा समाजाच्या आरक्षणास राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा जाहीर पाठींबा…

संपूर्ण महाराष्ट्र राज्य सखल मराठा बांधव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने करीत आहे.श्री. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षाणासाठी सतत उपोषण सुरु आहेत. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवत आहे. शासनस्तरावरून आरक्षण कमिटी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अहवाल अद्याप प्राप्त आहे. नुकतीच शासनाने समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत दिलेली आहे. सन १९६७ पूर्वीचे म्हणजे दिनांक पूर्वीचे पाहिले असता काही नोंदी व काही नोंदी मराठा जाती विषयी दस्तावेजात दिसून येतात. सदर समितीस संपूर्ण राज्यातून कुणबी आणि मराठा समाज हा अल्पभूधारक असून त्यांचे शेती हाच व्यवसाय आपल्या उदरनिर्वाहसाठी दिसून येत आहे. निसर्गाची कायमची अवकृपा आणि आरक्षण नसल्याने मराठा समाजाचे अर्थ कारण बिघडले असल्याने महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी दुर्दैवाने आत्महत्यांचे प्रमाण
स्वीकारले आहे त्यामुळे मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही न्यायकारक आहे. आणि मराठा समाजाच्या या न्यायकारक मागणीस राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष नाविद शेख यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात कायदेशीर अडचणीमुळे टिकू शकले नाहीत. म्हणून मा. साहेबांना या द्वारे विनंती करतो की, राज्य शासनाने मराठा समाजास कोणतेही कायदेशीर त्रुटी न ठेवता आणि वेळ काढू पणा न करता तत्काळ मराठा आरक्षण जाहीर करावे जेणेकरून आमच्या मराठा बांधवास न्याय मिळेल. असे पत्र त्यांनी मा. ना. एकनाथ शिंदे सो., (मुख्यमंत्री म. राज्य ), मा. ना. देवेंद्र फडणवीस सो., (उपमुख्यमंत्री म. राज्य ), मा. ना. अजित पवार सो., (उपमुख्यमंत्री म.राज्य ) यांना पाठविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button