धनाजी नाना महाविद्यालया चे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
सलीम पिंजारी
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2018 19 मध्ये विविध विषयात गुणवत्तापूर्ण घवघवीत यश संपादन करून कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या शैक्षणिक गुणवत्ता यादीत सुवर्णपदके व विशेष प्राविण्य मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे यात
दिपाली प्रकाश पाटील, एम. एस्सी. इनऑरगॅनिक केमिस्ट्री विषयात विद्यापीठात सर्वप्रथम (सीजीपीए 9.30)
कुणाल अर्जुन मानकर, बी. एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्र विषयात विद्यापीठात सर्वप्रथम व सुवर्णपदक ( सीजीपीए 5.97)
तेजस्विनी दिनकर पाटील, एम. ए. हिंदी विषयात विद्यापीठात सर्वप्रथम व सुवर्णपदक (सीजीपीए 9. 88 )
सुषमा प्रकाश पाटील, एम. ए. हिंदी विषयात विद्यापीठातून द्वितीय (सीजीपीए 9.88) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा मा आमदार रावेर विधानसभा मतदार संघ, मा श्री शिरीषदादा चौधरी, उपाध्यक्ष – मा प्रा डॉ एस के चौधरी, मा श्री दामोदर हरी पाटील,चेअरमन – श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा. चेअरमन मा प्रा के आर चौधरी, सचिव मा प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य – प्रा पी एच राणे, मा श्री मिलिंद बापू वाघुलदे, इतर सन्मा. कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा डी बी तायडे, उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा डॉ उदय जगताप तसेच रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा डॉ ए के पाटील, हिंदी विषयाचे विभागप्रमुख प्रा डी कल्पना पाटील सूक्ष्मजीव शास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा वैशाली महाजन यासोबत महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.






