Maharashtra

चिनावल कुंभारखेडा रस्ता दुरुस्तीचे कामं लवकरात सुरू करा, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विलास ताठे यांची मागणी

चिनावल कुंभारखेडा रस्ता दुरुस्तीचे कामं लवकरात सुरू करा, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विलास ताठे यांची मागणी..,

प्रतिनिधी विलास थोटे

गेल्या अनेक दिवसांपासून चिनावल कुंभारखेडा हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे, ह्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले असून,वाहन चालवणे डोकेदुखी ठरत आहेत,
वाघोदा,चिनावल,कुंभारखेडा या गावांना जोडणारा एकमेव रस्ता हा दुवा आहे, या परिसरात केळी ची मोठी बाजारपेठ आहे ,या परिसरात दररोज चाळीस, पन्नास, ट्रक केळीची वाहतूक बाहेर राज्यात याचं मुख्य रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी केली जाते, या एका ट्रक चे अंदाजे दिडेश ते पावणे दोनशे विंक्ंटल वजन असते, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, बैलगाडी, ट्रक्टर ,रिक्षा सह मोटारसायकल यांनी नेहमीच रहदारी ने वापरत असतात, तसेच आताचं पावसाळ्याचीही सुरूवात झाली असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला या नादुरुस्त रस्त्यामुळे जाणे येणे खुप जिकिरीचे होतं असून शेतकऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली असून सदर रस्तयाचे काम लवकर लवकर सुरू करावे, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवी,अशी मागणी कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी चे विलास ताठे यांनी
व्यक्त केली आहे.

त्याचप्रमाणे ह्या रस्त्यांची दुरवस्था , शेतकऱ्यांना यांचे रहदारी चे महत्व लक्षात घेता कै हरीभाऊ जावळे यांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त मंजूर करून घेतला होता, तरीही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी वर्क ऑर्डर वर सहीसाठी बराचसा वेळ घेतला, तसेच मार्च महिन्यात वर्क ऑर्डर वर सही करूनही चार महिने होतं आले असून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी रस्ता दुरुस्त कामं हाती घेतले नाही, यामुळे विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी विद्यमान आमदार यांच्या रावेर तहसीलदार कार्यालयात जनता दरबार आयोजित वेळी शिरीष चौधरी यांच्या कडे ह्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मागणी केली होती, आता तर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवून जबाबदारी, तत्परतेने या रस्त्याचे दुरूस्ती चे काम सुरू करावे, अशी मागणी संबंधित परिसरातील शेतकरी, सामान्य माणूस यांच्या कडून मोठ्या प्रमाणात होतं आहे, असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलास ताठे यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button