Maharashtra

कामगारप्रश्नी शरद पवारांना साकडे सीटूतर्फे डॉ . कराड यांनी पाठविले पत्र

कामगारप्रश्नी शरद पवारांना साकडे , सीटूतर्फे डॉ . कराड यांनी पाठविले पत्र

प्रतिनिधी शांताराम दुनबळे

महाराष्ट्रातील कामगारांच्या समस्यांबाबत कामगारमंत्र्यांनी कामगार संघटना संयुक्त कृती समितीसोबत बैठक घ्यावी अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ . डी . एल . कराड यांनी पाठविले आहे . राज्यातील कामगारप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती पवार यांना या पत्राद्वारे करण्यात आली आहे . पत्रात म्हटले आहे.

की राज्यात कामगारविषयक राज्यस्तरीय त्रिपक्षीय समित्यांवर अद्याप नेमणुका झालेल्या नाहीत . या समित्यांवर राज्यातील कामगार संघटनेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी घेऊन या समित्या गठीत कराव्यात व कामकाज सुरू करावे . असंघटित कामगार कल्याण कायदा २००८ मंजूर झाला आहे . परंतु , या कायद्याची देशभरात कुठेही अंमलबजावणी होत नाही . या कायद्यानुसार असंघटित क्षेत्रातील १२२ प्रकारची कामे करणाऱ्या असुरक्षित असंघटित कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे . त्यानुसार राज्यात ऊसतोडणी कामगार यंत्रमाग कामगार , रिक्षाचालक , टपरीधारक -हॉकर्स अशा क्षेत्रातील मदत होईल .

कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करून या मंडळामार्फत नोंदणी करून त्यांना कल्याणकारी योजना लागू करण्याबाबत निर्णय करावेत . यामुळे समाजातील कष्टकऱ्यांची क्रियाशक्ती वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नऊ हजार कोटींपेक्षा जास्त निधी शिल्लक आहे , येत्या काळामध्ये त्यांना १० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याबाबत निर्णय घ्यावा . २०१ ९ मध्ये कामगारांनी अर्ज करूनही नूतनीकरण करण्यात आलेले नाही

त्यामुळे यापूर्वी मंडळात नोंदलेल्या सर्व कामगारांना हे आर्थिक सहाय्य देण्यात यावे . आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायदा अंमलबजावणी केल्यास कामगारांचे स्थलांतर थांबेल व उद्योग आणि अर्थव्यवस्थेला पूर्ववत करण्यासाठी सहकार्य होईल . कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीला आपण व कामगारमंत्री यांनी वेळ द्यावा , आदी मागण्यांबाबत पवार यांनी लक्ष घातल्यास राज्यातील कामगारवर्गाला मोठा दिलासा मिळेल , अशी आशा डॉ.कराड यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button