Maharashtra

कळंब:-जनता कर्फ्युचा कालावधी कमी करा दलित पँथरची मागणी

कळंब:-जनता कर्फ्युचा कालावधी कमी करा दलित पँथरची मागणी

प्रतिनिधी सलमान मुल्ला

कळंब शहरातील कोरोना वाढती संख्या लक्षात घेता व कोरोना बाधीतांशी गावातील अनेक लोकांचा संपर्क आलेला असल्याने ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेवून दि.3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.
मात्र हा कालावधी छोटे व्यावसायिक व्यापारी फेरिवाले यांच्यासाठी त्रासदायक होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून हे सर्वजण अडचणीत सापडले आहेत. म्हणून या छोट्या व्यावसायिकांच्या व्यापाऱ्यांच्या मजूरांच्या आडचणी लक्षात घेऊन जनता कर्फु चा कालावधी कमी करावा जेणेकरून गोरगरिबांची उपासमार होणार नाही. तरी सदरील जनता कर्फु चा कालावधी दि.03 ते दि.06 असा कमी करण्याची मागणी ” दलित पॅंथर च्या वतीने कळंब च्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून यावर राहुल हौसलमल सिध्दार्थ वाघमारे आतिष वाघमारे रूषि आदमाने अभिषेक वाघमारे रूतुराज आदमाने विशाल वाघमारे चैतन्य वाघमारे ओम वाघमारे डिकसळ अविनाश कांबळे अविनाश टेकाळे, प्रतिक गोरे अमर गोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उपविभागीय अधिकारी कळंब यांना निवेदन देण्यात राष्ट्रवादीचे रंजित घुले या निवेदनावर राज घोडके , शेळके, वि़शाल हजारे वैभव गायकवाड राजपाल गायकवाड विशाल गायकवाड महेश कसबे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button