Amalner

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे २९ जानेवारीला अमळनेर बंद चे आवाहन

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे २९ जानेवारीला अमळनेर बंद चे आवाहन

अमळनेर येथिल बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने केंद्र सरकारने लादलेल्या हिंदूंसह सर्वच मुस्लिम व इतर धर्मियांना धोकेदायक ठरणाऱ्या एन आर सी ,सी ए ए कायद्याच्या विरोधात भारत बंद आंदोलनांतर्गत दि २९ जानेवारीला अमळनेर बंद चे आवाहन करण्यात आलेले आहे.

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे २९ जानेवारीला अमळनेर बंद चे आवाहनदेशातील १३५ कोटी भारतीय नागरिकांना स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोर्ट कचऱ्याच्या फेऱ्या मारायला लावून त्यांच्या जगण्याचा अधिकार ही हिरावून घेण्याच षडयंत्र केंद्र सरकारने एन आर सी कायद्याच्या माध्यमातून रचलेले आहे. या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी विविध टॅक्सी,रिक्षा युनियन ,व्यावसायिक व व्यापारी संघटनांना व पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून जाहिर आवाहन केलेले असून अमळनेर शहरातील अनेक संघटना बहुजन,आदिवासी, दलित मुस्लिम ओबीसी तसेच युवकांच्या संघटना या बंद आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याचे जाहीर केलेले आहे.बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीनं अमळनेर शहरात चौकात भारत बंद चे फलक लावण्यात आलेले आहेत.

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे २९ जानेवारीला अमळनेर बंद चे आवाहन

जनजागृती करणारे प्रचार पत्रकही वाटण्यात आलेले आहे.विविध भागात या जाचक एन आर सी कायद्याच्या संदर्भात कॉर्नर बैठका घेऊन बहुजन क्रांती मोर्चा व इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने नागरिकांना उत्स्फूर्त बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button