sawada

सावद्या कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराची सजावट सह पुजा अर्चना

सावद्या कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराची सजावट सह पुजा अर्चना

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे आज एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराची फुलांने सुंदर सजावट करून वारकरी संप्रदायाचा परंपरेनुसार सालाबादप्रमाणे काकडाचालू ठेवून थेट गावातून प्रदक्षिणा घालण्यात आली.व नंतर विठ्ठल मंदिरात काकडा आरती व पुजा अर्चा करून कार्तिकी एकादशीनिमित्त प्रसादाचे व केळीचे वाटत देखील करण्यात आले. सर्वांचे लक्ष वेधले जाईल मंदिरात अशी सुंदर फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे.तसेच सकाळ पासून दर्शन घेणाऱ्यांची गर्दी सुद्धा होत आहे.

“काार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशी साजरी करण्यात येते. म्हणजेच कार्तिकी एकादशी साजरी होते.वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये या एकादशीचे व्रत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते.या एकादशी व्रताचे वर्णन महाभारताच्या कथेतही आढळते. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते. यानंतर युधिष्ठिराने देखील एकादशीचे व्रत विधिवत पूर्ण होते.”

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button