Mumbai

10 वी 12 वी परीक्षेचे  वेळापत्रक जाहीर..!”ह्या” आहेत तारखा..! ह्या वेबसाईटवर मिळेल माहिती…!

10 वी12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..!”ह्या” आहेत तारखा..! ह्या वेबसाईटवर मिळेल माहिती…!

उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

दहावी परीक्षेचे वेळापत्रक असे आहे…

15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
19 मार्च : इंग्रजी
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग – 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

१२ वी परीक्षेचे वेळापत्रक …

४ मार्च – इंग्रजी
५ मार्च – हिंदी
७ मार्च – मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलुगू इ.
८ मार्च – संस्कृत
९ मार्च – वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
१० मार्च – भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र
११मार्च – चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
१२ मार्च – रसायनशास्त्र
१४ मार्च – गणित आणि संख्याशास्त्र
१५ मार्च – बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान
१६ मार्च – सहकार
१७ मार्च – जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास
१९ मार्च – भूशास्त्र, अर्थशास्त्र
२१ मार्च – वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म
२२ मार्च – अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण

ऑफलाइन होणार परीक्षा
इयत्ता दहावी आणि बारावीच्या मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांच वेळापत्रक आज बोर्डाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आलं आहे. यावर्षी ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्याच पद्धतीने 75 टक्के अभ्यासक्रमावर ही परीक्षा होणार आहे. कोविडच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव हा कमी झाला आहे. त्यामुळे 80, 90 आणि 100 टक्के मार्कच्या ज्या परीक्षा होणार आहे त्या परीक्षांना आर्धा तास आधी वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 50 60 आणि 70 टक्के मार्कच्या ज्या परीक्षा होणार आहे त्याला 15 मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे.असं देखील यावेळी गोसावी म्हणाले.तसेच आज पर्यंत बारावीच्या परीक्षेसाठी 1426980 विद्यार्थ्यांची तर दहावीसाठी 1527762 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पश्वभूमीवर विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय कमी झाल्याने यंदा होणाऱ्या सकाळच्या सत्रातील लेखी परीक्षा ही आर्ध्यातास आधी होणार आहे.तसेच इतर संपूर्ण माहिती www. mahahsc.in ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button