सावदा पोलिस ठाण्यात सपोनि देविदास इंगोले नी स्विकारला पदभार
सपोनि राहुल वाघ यांची नाशिक ग्रामीण पोलिस स्टेशनला बदली
प्रतिनिधी : मुबारक तडवी
रावेर : सावदा येथील पोलीस स्टेशन येथे स.पो निरीक्षक देविदास इंगोले यांनी गुरुवार ( दि .5 नोव्हेंबर ) रोजी दुपारी दोन वाजता पदाचा पदभार स्वीकारला . आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी काम करणार असून यापुढे गुन्हेगारी प्रवृत्ती च्या लोकांवर वचक बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले तर चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी देखील उभे राहू असेही ही ते म्हणाले जनतेत समन्वय निर्माण करण्यासह पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असून गुन्हेगारांना मात्र कायद्याची भीती वाटेल , अशाच पद्धतीने कार्य करणार असल्याची ग्वाही सावदा पोलिस ठाण्याचे नूतन सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांनी दिली






