स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे
अमृत महोत्सव दौड व वृक्षारोपण कार्यक्रम
नंदुरबार/फहिम शेख
भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. असे आदेश शासनामार्फत सर्व विभागांना देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आज दिनांक 21/07/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे वृक्षारोपण, हर घर तिरंगा, अमृत महोत्सव दौड इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय), नंदुरबार श्री. विश्वास वळवी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल नंदवाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खंडकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. योगेश चौधरी यांचेसह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते..नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे हस्ते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत फलकांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अमृत महोत्सव दौड हा कार्यक्रम आयोजीत केला असून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दिनांक 21 जुलै 2022 ते दिनांक 14 ऑगस्ट 2022 या दरम्यान जिल्ह्यात 75 कि.मी. चे अंतर धावणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून नंदुरबार ते उमदे खुर्द या दरम्यान आज ही 5 कि. मी. दौड़ घेण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती after खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून सदर दौडला सुरुवात करण्यात आली.सदर दौडमध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील हे स्वतः सहभागी झाले होते. तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी,
नंदुरबार श्री. सचिन हिरे यांचेसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर 15 पोलीस अधिकारी व 50 पोलीस अमलदार देखील सहभागी झाले होते. सदरची दौड चालू असतांना रस्त्याच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये दौडचे चित्रीकरण करत होते, तसेच टाळ्या वाजवून दौडमधील पोलीस अधिकारी व अमलदारांचे मनोबल वाढवत होते.आज सदर दौडने पहिला टप्पा हा नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून सुरु होऊन 5 कि.मी. अंतरावर असलेल्या उमदे खुर्द गावापर्यंत पूर्ण करण्यात आला. उमदे खुर्द गावात दौड पोहोचल्यानंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिक व विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून स्वागत केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त श्री. देविदास साळवे यांनी उमदे खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेतील झाडांकरीता ठिबक सिंचन व श्री. सिताराम पाटील यांनी वॉटर फिल्टर उपलब्ध करुन
fararara श्री. देविदास साळवे व श्री. सिताराम पाटील यांचे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा.श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले. अमृत महोत्सव दौड़ संपल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज लावून हर घर तिरंगा, अमृत महोत्सव दौड तसेच वृक्षारोपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 75 कि.मी. अमृत महोत्सव दौड़ नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत धावण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांनी सांगितले.






