Mumbai

वीणा शीच विवाह करणार…बिग बॉस मराठी 2 चा विजेता… शिव ठाकरे

वीणा शीच विवाह करणार…बिग बॉस मराठी 2 चा विजेता… शिव ठाकरे 

वीणा शीच विवाह करणार...बिग बॉस मराठी 2 चा विजेता... शिव ठाकरे

नुकताच रिऍलिटी शो बिग बॉस मराठी 2 ह्या लोकप्रिय शोचा विजेता शिव ठाकरे ठरला.१०० दिवस वेगवेगळे सेलिब्रिटी, सामान्य माणूस इ या रियालिटी शो मध्ये एकत्र राहून विविध कसोट्या पार करत विजेता होण्यासाठी प्रयत्न करतात.

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस मराठी २’ हा शो आहेे.संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष   बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याकडे होते. गेल्या १०० दिवसांपासून बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांपैकी नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर व वीणा जगताप हे सहा स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. मात्र त्यापैकी शिवने बाजी मारत जेतेपदाची ट्रॉफी आणि १७ लाखांची बक्षिसाची रक्कमही जिंकली. या विजयानंतर शिवने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ‘त्याला तु आणि वीणा मध्ये जे काही होते ते खरं आहे का?’ असा प्रश्न  विचारण्यात आला. त्यावर त्याने होकारार्थी उत्तर देत लवकरच याबद्दल मी माहिती देेेईल असं सांगितलं. पण याआधी आपल्या आईला यासाठी राजी करावं लागेल असंही शिवने स्पष्ट केलं.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे शिव आणि वीणा जगताप. या दोघांच्या मैत्रीचे किस्से घरातच नाही तर घराबाहेर प्रेक्षकांमध्येही चांगलेच रंगले. शिव आणि वीणाचं हे प्रेम ‘बिग बॉस’नंतरही कायम राहणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यासंदर्भात बोलताना शिवने घरात तुम्ही जे ऐकलं तेच पुढे होणार असल्याचं सांगत लग्नाचे संकेत दिले आहेत. ‘शंभर टक्के प्रेक्षकांनी जे कार्यक्रमामध्ये ऐकलं तेच होणार आहे. त्यात काहीच बदल होणार नाही. माझ्यासाठी त्या शंभर दिवसांमध्ये झालेली कोणतीही गोष्ट शो जिंकण्यासाठी मी केली नाही,’ असं शिवने स्पष्ट केलं. कार्यक्रम संपल्यानंतरही शिव-वीणाची जोडी बाहेरही दिसेल का असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचेही उत्तर शिवने दिले आहे. ‘मी आता आमचं नात कसं असेल हे सांगण्यापेक्षा तुम्हाला पुढे ते दिसेलच. जेवढं तुम्हाला आतमध्ये दिसायचं तेच बाहेरही दिसेल. तिचं आणि माझं दोघांचही करियर आहे. या सर्वांचा विचार करुन निर्णय घेऊ,’ असं शिवने सांगितलं. इतकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला लग्नाची पत्रिका मिळेल असंही शिवने एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button