मोठा वाघोद्यातील प्रतिबंधित क्षेत्राची तालुका वैद्यकीय अधिकार्याकडून पाहणी
सावदा पोलिसांनी कंटेंटमेंन्ट झोन मध्ये पार्किंगसह रहदारी करणार्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
प्रथम कोरोना पॉझिटिव्ह महिलेची कोरोनावर मात निगेटिव्ह आला अहवाल
प्रतिनिधी मुबारक तडवी
मोठा वाघोदा येथील कोरोना बाधितांची संख्या दोन मयतांसह १३ वर येऊन पोहचली आहे त्यातील रजा कॉलनी तील प्रथम कोरोना संक्रमित महिलेची कोरोनावर मात करत विजय मिळवला आहे व आपला निगेटिव्ह अहवाल प्राप्त करीत कोविड सेंटर मधून त्यांची रुग्णालयातर्फे घरवापसी करण्यात आली आहे मात्र एकाच कुटुंबातील ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. याचं पार्श्र्वभूमीवर रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील यांनी आज मोठा वाघोदा येथे भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली व आरोग्य विभाग कर्मचारी,आशासेविका , अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना आवश्यक त्या सुचना दिल्या तर फैजपूर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे आदेशान्वये , तहसिलदार उषारानी देवगुणे यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल वाघ यांनी वाहतूक शाखेचे पोहेका सलीम तडवी ,पोकॉ.रुस्तूम तडवी सह कर्मचारी यांनी प्रतिबंधित क्षेत्रात मोटारसायकल पार्किंग रहदारी विना मास्क फिरणार्यांनवर दंडात्मक कारवाई केली.






