Kolhapur

कोरोना व्हायरसला प्रतिबंद करण्यासाठी मराठी शाळानां 31 मार्च पर्यंत सूट्टी जिल्हा परिषद सदस्य जिवनदादा पाटील यांची माहीती

कोरोना व्हायरसला प्रतिबंद करण्यासाठी मराठी शाळानां 31 मार्च पर्यंत सूट्टी

जिल्हा परिषद सदस्य जिवनदादा पाटील यांची माहीती

कोल्हापूरः आनिल पाटील

कोरोना व्हायरस चा प्रादूर्भाव
रोखण्यासाठी सरकारने शाळांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे अशी माहीती जिल्हा परिषद सदस्य जिवनदादा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे .

या निमित्ताने मुलांना
शाळा,परीक्षा,विविध क्लास,ट्युशन्स यापासून सुटका होऊन थोडा मोकळा श्वास घेण्यास उसंत मिळालेली आहे.. तेंव्हा हे स्वातंत्र्य त्यांना उपभोगू द्या.
तुम्हालाही रोजच्या रहाट गाडग्यातून मोकळीक आहे
.तेंव्हा मुलांशी
मनमोकळा संवाद साधा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. साथीचे रोग,ती पसरण्याची कारणे,कोरोना व्हायरस ,त्याचे परिणाम ,काळजी कशी घ्यावी यावर चर्चा करा,प्रात्यक्षिक घ्या .त्यावरील लेख,बातम्या,जागतिक व्हिडीओ आपल्या पाल्यास आवर्जून दाखवा.स्वतःचे आरोग्य किती महत्वाचे आहे याची जाणीव त्यांना होऊ द्या.आरोग्य ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही हे लक्षात आले की ते आपोआप काळजी घेतली..
आरोग्याच्या,खाण्यापिण्याच्या,स्वछतेच्या आणि शिस्तीच्या सवयी या निमित्ताने त्यांच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्न करा . आपण कुटुंबाला हवे आहोत आणि कुटुंबात आपल्याला किंमत/मान आहे या दोन
मुलांच्या बेसिक गरजा आहेत .त्याची पूर्तता कुटुंबाकडून होत असेल तर मुले निराश होत नाहीत…,कोणत्याही कठीण प्रसंगाचा मुकाबला करण्यासाठी तयार असतात;म्हणून त्यांना तुम्ही किती प्रेम करता याची जाणीव करून घ्या.
घरी आहेत म्हणून मुले दंगा,आरडाओरडा,मारामारी करतात /सारखं खायला मागतात म्हणून सारखं त्यांना रागावू नका.त्यांना स्वयंपाक करताना मदतीला घ्या. प्रात्यक्षिक दाखवा. मुलगा असो वा मुलगी -ज्याला खायला लागतं त्याला बनवता आलंच पाहिजे असे जाणीवपूर्वक सांगा.
उठसुठ अभ्यासाला बसण्याची सूचना देऊ नका..शाळेचा ,शिक्षकांचा
मुख्याध्यापकांचा उद्धार मुलांसमोर करू नका.परीक्षा कधी होणार म्हणून मुलांसमोर सारखी काळजी करत बसू नका..शिक्षकांनी अभ्यास दिलाच नाही असं मुलं नेहमीच सांगत असतात..
अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे..आता वेळ आहे तर थोडी उजळणी घ्या. सराव पेपर सोडवून घ्या.स्वतः सरावासाठी पेपर सोडवायला द्या.मुलं प्रश्न प्रकारावरून खूप छान प्रश्नपत्रिका तयार करतात ती केल्यावर शाबासकी द्या.पाल्याला कोणता विषय कठीण वाटतो ते पहा.न समजलेल्या पुस्तकी गोष्टी प्रत्यक्ष जीवनात किती सोप्या आहेत ते तुमच्या अनुभवाच्या माहितीवरून समजावून सांगा.
त्यांचे अनुभव विश्व समृद्ध करणारे छंद जोपासायला प्रोत्साहन द्या.
स्वतःचं फ्रष्टेशन मुलांवर काढू नका.निगेटिव्ह बोलू नका…कोरोना मुळे असंख्य गोष्टी इफेकटेड होत आहेत…अर्थव्यवस्था ढासळलेली आहे.. *अश्या आणीबाणीच्या प्रसंगात एकमेकांना साथ देत आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड कसे द्यायचे हे पाल्य सध्य परिस्थिती मुळे शिकेल

ताणतणावाचे नियोजन कसे करायचे हे त्यांना कळू द्या..खूप काळजी नको आणि खूप बेफिकीरीही नको.मुलांना बाहेर भटकायला पाठवू नका.. बाहेरचे खायला देऊ नका..थंड पेये देऊ नका..कामाशिवाय बाहेर जाऊ नका..
कोरोना वर कोणी औषध देतो म्हणून फसवले .. अंधश्रध्दा बाळगू नका.अफवांवर विश्वास ठेवू नका. गैरसमज पसरवू नका*
1 एप्रिल पासून /त्यानंतर सूचनेप्रमाणे परिक्षा होतील ..कोणतीही परीक्षा जिवा पेक्षा महत्वाची नाही…..
काळजी घ्या….आरोग्यदायी राहा…कोरोनाला आपल्या देशातून हाकलून लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व सहकार्य करावे असे आव्हान ही जिवनदादा पाटील यांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button