पंढरीतील नाट्यकलावंतानाही मनसेचा आधार
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूरः येथील नाटय व आर्केष्ट्रा कलावंताना मदतीचे वाटप करताना डाॅ.मंदार सोनवणे, दिलीप कोरके, दिलीप धोत्रे, शशिकांत पाटील आदी.पंढरपूर,ता.13- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन वाढवण्यात करण्यात आला आहे. लाॅकडाऊनचा फटका सर्वसामान्य लोकांना बसला आहे. त्याच बरोबर कलेच्या जोरावर आपली उपजीव करणाऱ्या नाट्य व आर्केष्ट्रा कलवंतानाही कोरोनाचा फटका बसला आहे. पंढरपूर शहरातील अशा अच़णीत सापडलेल्या नाट्यवंत कलावंताना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करुन कलावंती कदर करत त्यांनाही आधार दिला आहेअखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डाॅ.मंदार सोनवणे व नियामक मंडळाचे सदस्य दिलीप कोरके यांच्या हस्ते कलाकारांना मदतीचे वाटप करण्यात आले.
पंढरपूर शहराला नाट्य व साहित्य कलेची मोठी परंपरा आहे. येथील अनेक कलाकार आणि साहित्यिकांनी राज्यात आणि देशात आपला नावलौकीक केला आहे. आजही पंढरपूरात अनेक कलाकारांनी नाटय़ कला जिवंत ठेवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक नाट्य आणि आर्केष्ट्रा कलाकारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अशा संकटाच्या काळात मदतीचा हात म्हणून मनसेच्या वतीने आशा गरीब व गरजू कलावंताना गव्हु, तांदुळ, साखर, तेल याबरोरच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राज्यात लाॅकडाऊनची मुदत 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आल्याने अनेक लोकांचे हाल होत आहेत.यामध्ये कालकारांनाची देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. मदतीच्या भावनेतून मनसेच्या वतीने आज येथील सोनार महाराज मठामध्ये अनेक नाट्य आणि आर्केष्ट्रा कलावंताना मदत देण्यात आली. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, अर्जून जाधव, कलाकार राजू पुरंदरे, गणेश गोडबोले, प्रमोद हंसराज, संजय रणदिवे आदी उपस्थित होते.






