Aurangabad

?️ स्त्री जीवनाचे दुःख मांडणारी कवयित्री : पुनम सुलाने

स्त्री जीवनाचे दुःख मांडणारी कवयित्री : पुनम सुलाने

औरंगाबाद गणेश ढेंबरे

वास्तववादी लेखन हे साहित्य क्षेत्राचा गाभा मानला जातो. समाजात भिषण वास्तव दडलेले असते. आणि त्या वास्तव परिस्थितीचा वेध लेखक किंवा कवी घेत आसतो. समाजातील समस्या मग ती कुठलिही असो ती समस्या आपल्या साहित्यातून मांडणे हे सृजनशील साहित्यिकाचे कर्तव्य असते. अशाच सृजनशील साहित्यिकांची संख्या ही खुप कमी असते. त्या साहित्यिकांमध्ये कवयित्री पुनम सुलाने यांचे नाव आदराने घेतले जाते. पुनम सुलाने या मुळच्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात जाफ्राबाद तालुक्यातील गोकुळवाडी या छोट्याशा खेडेगावातील. त्यांना बालपणापासूनच साहित्य वाचनाची व लेखनाची आवड होती. त्या खेडेगावातील असल्यामुळे त्यांना खेड्यातील वास्तव परिस्थितीची जाण आहे. या जाणिवेतूनच त्यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला.

विवाहानंतर कवयित्री पुनम सुलाने यांचे पती आर्मीमध्ये असल्यामुळे पुनम सुलाने यांचे वास्तव्यही देशातील विविध राज्यामध्ये झाले. त्यामुळे त्या त्या राज्याची बोलीभाषा, रूढी परंपरा, ग्रामीण स्त्रीचे दुःख, विविध समस्या, त्यांच्या साहित्यातून आपणास पहावायास मिळते. कवयित्री सुलाने यांचा ‘जीवन के सप्तरंग’ हा ९२ कवितांचा हिंदी कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यातील एक एक कविता वाचत असतांना स्त्री जीवनातील दुःख आपोआपच वाचकाच्या डोळ्यासमोर उभं राहतं. तसेच निराश झालेल्या माणसाच्या मनात ज्योत पेटविण्याचे काम ही कवयित्री पुनम सुलाने यांची कविता करते. जोपर्यंत आपल्या जीवनात दुःख येत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची किंमत कळत नाही. हा ही संदेश कवयित्री सुलाने यांची कविता देवून जाते. आपल्या एका कवितेत त्या अशा लिहितात.

हर किसी को हर चीज
मिल जाये तो
कमी कुछ ना होगी
जबतक यह पता ना चले
अंधेरा होता है क्या
तबतक रोशनी की भी
कोई किंमत न होगी.

असा अनमोल संदेश कवयित्री पुनम सुलाने कवितेच्या माध्यमातून वाचकांना देतात. तसेच सकारात्मकतेवर आधारित ‘भावपुष्प’ हे २१ लेखांचे ऑनलाईन पुस्तक प्रकाशित झालेले आहे. दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. हिंदी कवितेबरोबरच कवयित्री सुलाने या मराठी कविता देखील लिहीत असतात. हिंदी कवितेप्रमाणेच मराठी कवितेत देखील वास्तवता आपणास पहावायास मिळते. त्या आपल्या कवितेत लिहीतात.

स्वार्थाच्या बाजारात निस्वार्थीपणा
विकत घेणारं कोणी नसतं
इच्छा असते पूर्ण जग बघण्याची
मात्र स्वत:मधला ‘स्व’ जाणून
घेणारं कोणीच नसतं.

असे जीवनातील वास्तव परिस्थितीचा वेध कवयित्री पुनम सुलाने या घेत असतात. तसेच त्यांचा मराठी कवितांचा काव्यसंग्रह लवकर प्रकाशित होणार आहे. तसेच स्त्री जीवनातील दुःख मांडणारी कवयित्री म्हणून कवयित्री पुनम सुलाने यांची साहित्य क्षेत्रात ओळख निर्माण झालेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button