माळेगाव कारखान्याची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे
प्रतिनिधी-आनंद काळे
बारामती-साखर आयुक्तांच्या आदेशानुसार माळेगाव कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी पोलीस बंदोबस्तमध्ये कारखान्याचा पदभार स्वीकारला.विशेषतः ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माझ्या संचालकांचा 30 एप्रिल पर्यन्त कार्यकाळ आहे असा दावा केल्याने सत्ताधारी व विरोधक ह्यांच्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
माळेगावच्या पंचवार्षिक निवडणूकिमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेशवर पॅनेलने 17 विरुद्ध 4 जागांच्या फरकाने विजय मिळवला होता.त्यानुसार 8मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकारी शहाजीराव हिरे यांनी नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत बाळासाहेब तावरे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी तानाजी कोकरे यांची निवड करण्यात आली होती.परंतु मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांच्या संचालक मंडळाच्या काळ हा4 एप्रिल पर्यन्त आहे त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता त्यामूळे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब तावरे उपाध्यक्ष तानाजी कोकरे याना एक महिना प्रतीक्षा करावी लागली होती.
पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता,त्यानंतर हे संतातर घडले.बाळासाहेब तावरे यांनी सर्वाधीक 14 वर्ष कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले आहे






