Amalner

?️अमळनेर कट्टा..बॅनर बाजी..!कर्तव्यदक्ष अधिकारी..!जातीयवाद..!षडयंत्र..!नवीन मुख्याधिकारींना इशारा..!बाबू समझो इशारे..!

?️अमळनेर कट्टा..बॅनर बाजी..!कर्तव्यदक्ष अधिकारी..!जातीयवाद..!षडयंत्र..!नवीन मुख्याधिकारींना इशारा..!बाबू समझो इशारे..!

जेंव्हा एक “व्यवस्थेला” न चालणारा अधिकारी दिलगिरी व्यक्त करतो..!

सहिष्णू समजला जाणारा समाज शेवटी पडला राजकारणाला बळी..!

अमळनेर येथे काल रात्री एक वेगळंच नाटक घडलं.ह्या नाटकाचे सूत्रधार कोण? संपूर्ण व्यवस्थेला वेठीस धरणाऱ्या ह्या नाटकाची प्रत्यक्ष रंग भूमीवरील पात्र वेगळी होती. तर पडद्याआड वेगळीच यंत्रणा कार्यरत होती अशी चर्चा शहरात जोरदार पणे सुरू आहे. काल अमळनेर नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनाधिकृत फलक शहरातून काढून टाकले. यात जैन समाजाच्या एका फलकाचा समावेश होता. यावर राजकीय षडयंत्र रचत जैन समाजातील अनेक लोकांनी प्रशासन आणि व्यवस्थेला वेठीस धरले. वास्तविक जैन समाज हा अत्यन्त शांत आणि सहिष्णू असा समाज आहे.कोणालाही जोरात देखील बोलणे,किडा मुंगी जीव यांच्या जीवाची काळजी घेणारे,चुकूनही वाईट शब्द बाहेर पडला तर मृच्छामी दुकडंम करून माफी मागणारा हा समाज..आपला व्यवसाय आणि काम धंदा यात व्यस्त राहून अत्यन्त शांततेत कोणाच्याही भानगडीत न पडता जीवन जगणारा हा समाज..!

अचानक एका षड्यंत्राला बळी पडतो.विषय काहीच नाही..!त्याला जातीय रंग देणं..! एका निस्पृह अधिकाऱ्याला दिलगिरी व्यक्त करायला लावणं..! का..! तर तो अधिकारी “व्यवस्थेचा “चालक नाही..! तो भीक घालत नाही..! चुकीचं वागत नाही..! तो तुमच्या सिस्टीम चा भाग नाही..! यामुळे तो तथाकथित राजकीय वर्तुळाला चालत नाही..! मग काय त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी काहींना काही षडयंत्र रचावे लागत आहेत.हे सर्व षडयंत्र कुठून जन्माला आले..!कोण कोणाचा घर जावई आहे..? कोठा..! री..? कटा..! री..! या..! कोण कोणाची “री’ ओढत आहे..! कोणाचा कुठे फायदा होतो आहे..? कोण षड्यंत्राला बळी पडत आहे..?या सर्व प्रशांची चर्चा जोरदारपणे गावात सुरू आहे.

नवीन मुख्याधिकारी यांनी पदभार सांभाळून काही दिवसच झाले आहेत..! ही त्यांना चुणूक दाखविण्यात आली का? सिस्टीम मध्ये राहायचं अन्यथा काय होऊ शकत आणि काय होऊ शकत नाही..! नवीन मुख्याधिकऱ्यांनी येताच वसुलीचा जोरदार धडाका सुरू केला आहे..!यात शहरातील जाने माने..मंजे हुये.. मोठ्या हस्ती आहेत..हळू हळू कार्यवाहीचा बडगा त्यांच्या दिशेने येणारच आहे..!मग त्याआधीच गेम दाखवला आहे का ? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे..!पाहू या पुढे काय होते ते..! पण कार्यवाहीच करायची तर सर्वांवर करावी आणि नसेलच करायची तर सर्वांना करा रान मोकळं..! असंही अमळनेर नगरपरिषद खूप वशिलेबाजी करत असतेच..!त्यात मग अतिक्रमण असो की निविदा प्रक्रिया, शॉपिंग च वाटप..!अनेक विषय आहेत..!आजूबाजूचे चार समर्थक आणि चार विरोधक खुश झाले की विषय संपला..!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button