Maharashtra

पहिल्याच पावसात बंधारे झाले फुल-घनश्याम अग्रवाल याच्या हस्ते झाले जलपूजन

पहिल्याच पावसात बंधारे झाले फुल-घनश्याम अग्रवाल याच्या हस्ते झाले जलपूजन

पहिल्याच पावसात बंधारे झाले फुल-घनश्याम अग्रवाल याच्या हस्ते झाले जलपूजन

 चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
तालुक्यातील विविध ठिकाणी घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाकडून तलाव ,नाले खोलीकरण करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील हातेड बु गावी देखील मोठं काम भाजप नेते घनश्याम अग्रवाल व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने नाला खोलीकरण करण्यात आले त्या नाल्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात लाखो लिटर पाणी अडकल्याने गावकऱ्यांनी आज दि ५ रोजी सकाळी नऊ वाजता भाजप नेते घनश्याम अग्रवाल याच्या हस्ते साडी चोळी टाकून विधिवत पूजा करण्यात आली,तसेच तहसीलदार अनिल गावित याच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी चोसाका व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे,घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन निकम,जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे,गावचे माजी सरपंच मनोज सनेर,सरपंच सुनील बाविस्कर,शिवसेना माजी तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे,विनोद पाटील,सागर पठार,सूतगिरणी संचालक राहुल पाटील,हातेड येथील वसंतराव बावीस्कर,विजय सोनवणे,,तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र सनेर,विकास सोसायटी चेअरमन सतीश सोनवणे,व्हाईस चेअरमन शरद सोनवणे,गणेश सनेर,दिलीप सनेर,ग्रामसेवक भूषण पाटील,वृक्ष फाऊंडेशन चे अध्यक्ष रामकृष्ण सनेर,जितेंद्र सनेर,कल्पेश सनेर,कल्पेश सोनवणे,व ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.
या भरलेला बांधरामुळे हातेड बु परिसरातीळ शेतीला मोठी मदत मिळणार असून गावाच्या पिण्याचा पाण्याला देखील मोठी मदत होणार असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी ग्रामस्थांची या बंधाऱयाला आर्थिक मदत करणाऱ्या भाजप नेते घनश्याम अग्रवाल याचे शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार गावाच्या वतीने मनोज सनेर यांनी ऋणात राहू असे सांगितले.तसेच तहसीलदार अनिल गावित यांनी देखील खोलीकरण कामाला कागदपत्रांची अडचण येऊ दिली नाही म्हणून शाल देऊन जाहीर सत्कार केला होता.
**स्मशानभूमीत केली शंभर वृक्षची केली लागवड:–जलपूजन झाल्यानंतर भाजप नेते घनश्याम अग्रवाल व तहसीलदार अनिल गावित याच्या हस्ते हातेड बु येथील स्मशानभूमीत शंभर वृक्षाची लागवड करण्यात आली होती.
गावकऱ्यांच्या एकच मागणीला होकार देऊन आमचे नेते घनश्याम अग्रवाल यांनी जवळपास पन्नास ते साठ तास पोकलेण्ड चालवून भले मोठे खोलीकरण करून दिल्याने आज त्या नाल्यात पहिल्याच पावसात लाखो लिटर पाणी अडवले गेल्याने गावची पाणी पुरवठा योजना व शेतीला त्या अडवलेल्या पाण्याने मोठी मदत होणार आहे.”
–मनोज सनेर माजी सरपंच हातेड बु 
घनश्याम अग्रवाल याच्या कडे दातृत्व मोठे असून आमच्या मागणीला होकार देऊन मोठी आर्थिक मदत त्यांनी केली,आज गाव खऱ्या अर्थाने पाणीदार झाले आहे.”
-देवेंद्र सोनवणे माजी तालुकाप्रमुख शिवसेना

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button