Amalner

अखेर म्हसवे धरणाच्या पाण्यातून भोकरबारी धरण भरायला सुरुवात आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी तहानलेल्या धरणास मिळाली जलसंजीवनी

अखेर म्हसवे धरणाच्या पाण्यातून  भोकरबारी धरण भरायला सुरुवात

आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी तहानलेल्या धरणास मिळाली जलसंजीवनी

अखेर म्हसवे धरणाच्या पाण्यातून भोकरबारी धरण भरायला सुरुवात आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी तहानलेल्या धरणास मिळाली जलसंजीवनी

अमळनेर गेल्या वर्षांपासून पाण्याअभावी कोरडेठाक असलेल्या भोकरबारी धरणात आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी म्हसवे धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने या तहानलेल्या धरणास जलसंजीवनी मिळाली आहे.
          पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरण यंदाच्या पावसाळ्यात देखील न भरल्याने म्हसवे धरणातील पाणी भोकरबारी धरणात सोडण्याची मागणी आ.शिरीष चौधरींनी राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांना लेखी पत्रांवये केली होती,आमदारांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंत्री महोदयांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने म्हसवे धरणाचे पाणी या धरणात सोडण्यात आले आहे,यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.यामुळे परिसरातील गावांच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

अखेर म्हसवे धरणाच्या पाण्यातून भोकरबारी धरण भरायला सुरुवात आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी तहानलेल्या धरणास मिळाली जलसंजीवनी

यासंदर्भात आ चौधरी यानीं ना.महाजन यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सदर मागणीबाबत निवेदन दिले होते,यात त्यांनी नमूद केले होते की अमळनेर मतदार संघातील सुमारे 42 गावे ही पारोळा तालुक्यात येत असून भोकरबारी धरणावर यातील अनेक गावांच्या पाणी पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत,दुर्दैवाने गेल्या वर्षीही या धरणात जलसाठा नसल्यामुळे संबधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता,त्यात भर म्हणजे या वर्षी देखील भोकरबारी धरणात मृत जलसाठा देखील झालेला नाही , यामुळे संबधित गावांना पाण्याच्या भीषण टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तरी यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून म्हसवे तलावातून अतिरिक्त वाहणारे पाणी भोकरबारी धरणात सोडण्यासाठी संबंधित विभागास आदेशीत करावे.अशी मागणी आमदारांनी केली होती.अखेर मंत्री महोदयांना ही मागणी रास्त वाटल्याने त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊन ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. कधीच न आटणारे भोकरबारी धरण आटल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात  चिंता  होती शेवटी कार्यतत्पर आमदार शिरीष चौधरी यांनी हा प्रश्न सोडविल्याने परीसरातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्था मधून त्यांचे विशेष कौतुक होत  आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button