Amalner

?️अमळनेर कट्टा..आणि अमळनेर नगरपरिषदेला लागले भिकेचे डोहाळे..!विविध प्रकारचा निधी पचविल्या नंतर भ्रष्ट नगरपरिषदेचे जनतेला आवाहन..!पहा काय भीक मागत आहे न प…!

?️अमळनेर कट्टा..आणि अमळनेर नगरपरिषदेला लागले भिकेचे डोहाळे..!विविध प्रकारचा निधी पचविल्या नंतर भ्रष्ट नगरपरिषदेचे जनतेला आवाहन..!पहा काय भीक मागत आहे न प…!

अमळनेर गेल्या संपूर्ण एक वर्षात संपूर्ण जगात.देशात,महाराष्ट्रात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर लाखो लोकांना आजार,बेरोजगार ला सामोरे जावे लागले तर लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. अमळनेर तालुक्यात देखील कोरोना विषाणूची लागण मोठया प्रमाणात झाली असून मागील वर्षी अमळनेर हॉट स्पॉट ठरला होता. आताही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संपूर्ण तालुक्यात कोरोना मुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. लोकांना रोजगार नाही.हात मजूर ,कामगार,मध्यम वर्गीय जनता रडकुंडीला आली आहे. आणि यात आता कहर म्हणून अमळनेर नगरपरिषदेने जाहीर आवाहन करून जनतेला मदत मागितली आहे..!

काय आहे आवाहन..?

विनम्र आवाहन,
अमळनेर शहरातील तमाम नागरिकांना कळविण्यात येते की अमळनेर शहरात व तालुक्यात सद्यस्थितीत कोरोना आजाराचे प्रचंड प्रमाण वाढलेले आहे त्या कोरोनाच्या रुग्णांना सुविधा मिळावी म्हणून ग्रामीण रुग्णालय बरोबर इंदिरा गांधी भुवन येथे बेड संख्या वाढविण्यासाठी काही गोष्टींची उणीव आहे उदारणार्थ ऑक्सीजन सिलेंडर ,बेड, गाद्या, जनरेटर ,ऑक्सिजन पाईपलाईन या सारख्या वस्तूंची नितांत गरज आहे व लोकसहभागातून हे उपलब्ध व्हावे त्याचबरोबर खाजगी
डॉक्टरांनी देखील सेवा यकामासाठी द्यावी याकरिता शहरातील दानशूर व्यक्तींना आव्हान करण्यात येते की या सर्व कामासाठी सुमारे आठ ते दहा लाख पर्यंतच्या
खर्च अपेक्षित आहे तरी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या कामात वस्तुरूपी मदत करावी अशी प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे धन्यवाद..!

आता अमळनेर नगरपरिषदेने काही उत्तरे द्यावीत…!

अमळनेर येथे कोरोना च्या प्रादुर्भाव रोगराई नियंत्रण मिळविण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाकडून निधी उपलब्ध करण्यात आला होता.त्याचा हिशोब लागलाच नाही…शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे जोरात सुरू आहेत.यात करोडो रु चा निधी उपलब्ध झाला आहे. ही कामे खूपच महत्वाची आहेत असेही नाही..!यातील कोणतं तरी एक काम नंतर ही होऊ शकत..!अनेक ठिकाणी अमळनेर नगरपरिषदेकडून आर्थिक उधळपट्टी केली जात आहे. ती थांबवली तर पुरेसा पैसा नगरपरिषदेकडे शिल्लक राहू शकतो.अमळनेर ची जनता सुविधा नसताना कर भरत आहे.उदा किती तरी भाग असे आहेत की जेथे रस्ते ,गटारी उपलब्ध नाहीत.वृक्ष कर घेतला जातो पण एकही वृक्ष रस्त्याच्या कडेला लावला जात नाही. दुभाजकां मध्ये असलेले वृक्ष नसून छोटी छोटी रोपटी आहेत आणि ती ही शिल्लक राहिली नाहीत.शिक्षण कर वसूल केला जातो पण एकही न प ची शाळा सुरू नाही.. महा शिक्षण करही जनता देते..!ड्रेनेज कर दिला जातो पण गटारी काढणे व स्वच्छता ठेवणे हे न प चे काम नाही त्यामुळे ते करत नाहीत..!गटारींचे सांड पाणीच पुढे वाहत नाही..!पण कर मात्र वसूल केला जातो..!स्वच्छता अभियानांतर्गत औषध फवारणी वर्षानुवर्षे करण्यात येत नाही.. पण कर मात्र वसूल केला जातो..! आता तर वसुली कार्यक्रम जोरात सुरू आहे. मग तो निधी कुठे जातो..?याचे उत्तर न प ने द्यावे..!अनेक प्रकारचे निधी न प ला विविध उपक्रमांसाठी मिळत असतात.त्या विषयी देखील जनतेत प्रश्न आहेत.

मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल्स ला एन ओ सी देतांना टेबला खालून पैसे घेण्या ऐवजी जर नियमांत वसुली केली तर न प ला भीक मागण्याची वेळ येणारच नाही..नगरसेवक आणि राजकीय ?नेत्यांचे लाड बंद केले तर न प ला भीक मागावी लागणार नाही. स्वतःच्या तिजोऱ्या भरण्या ऐवजी लोक कल्याणकारी कामांवर आणि खऱ्या विकासावर भर दिला तर भीक मागावी लागणार नाही…अमळनेर च्या मुख्याधिकारीना तर अमळनेर एव्हढं आवडलं आहे की “विद्या” सोडून “लक्ष्मी बाई” च जास्त दिसत असल्याने उच्च पदालाही नकार दिला आहे..!यातील च लक्ष्मी बाईंचा उपयोग केल्यास भीक मागावी लागणार नाही..!जे ठेकेदार अमळनेर न प च्या वाशिल्यावर मोठे होत आहेत..!तुफान पैसा कमवत आहेत..!माडी वर माडी बांधत आहेत त्यांच्याकडून घ्या की निधी भीक मागावी लागणार नाही..!

याचाच अर्थ फक्त स्वार्थापोटी “अर्थ” कारण बरोबर जमलं आहे पण लोककल्याण साठी “अर्थ” कोलमडले आहे..!यात खूप काही “अर्थ” दडलेला आहे..!सुजाण नागरिकांना ते काही सांगणे नको..

?️अमळनेर कट्टा..आणि अमळनेर नगरपरिषदेला लागले भिकेचे डोहाळे..!विविध प्रकारचा निधी पचविल्या नंतर भ्रष्ट नगरपरिषदेचे जनतेला आवाहन..!पहा काय भीक मागत आहे न प...!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button