Amalner

देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा…

देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा…

अमळनेर : देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम बंडू बैसाणे यांनी केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. संचलन स्काउट शिक्षक एस. के .महाजन यांनी केले. इयत्ता 10 वी तील विद्यार्थिनींनी ध्वज गीत सादर केले. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे संचालक धर्मराज पाटील राजेंद्र कौतिक पाटील ज्येष्ठ नागरिक उखर्डू बैसाणे, माजी उपसरपंच अनिल वसंत पाटील, पोलीस पाटील छोटू मोरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे, ग्रामसेवक निकुंभ भाऊसाहेब, पुंडलिक पाटील ,भटू त्र्यंबक पाटील ,अविनाश त्र्यंबक पाटील, सुपडु भाऊराव पाटील, गोपाल सुदाम पाटील ,निलेश आबा पाटील, योगेश संजय पाटील, मुकेश नवल पाटील, ,सचिन सुभाष पाटील,विशाल बापुराव पाटील,चेतन भास्कर महाले,नरेंद्र पाटील, सह अनेक शैक्षणिक सामाजिक व विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक ईश्वर महाजन एच ओ. माळी ,अरविंद सोनटक्के व शिक्षकेत्तर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, गुरुदास पाटील यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Back to top button