Solapur

ऑनलाइन ऑफलाइन शिक्षणात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रिया राबवावी- हरिश कडु केंद्र अरण ची ऑनलाइन शिक्षण परिषद संपन्न.

ऑनलाइन ऑफलाइन शिक्षणात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रिया राबवावी- हरिश कडु
केंद्र अरण ची ऑनलाइन शिक्षण परिषद संपन्न.

सोलापूर : आज दिनांक २०/०३/२०२१ रोजी गुगल मीट अॅपद्वारे अरण केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न झाली. या शिक्षण परिषदेसाठी डायट वेळापूरचे समन्वयक व केपीऐएलपी कार्यक्रमाचे सोलापूर जिल्हा समन्वयक हरीश कडू सर, पंचायत समिती विषय तज्ञ सुभाष राऊत, अरण केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे सर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षण परिषदेसाठी उपस्थित होते.
शिक्षण परिषदेची सुरुवात केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांच्या प्रास्ताविकाने झाली . प्रथम covid-19 काळात सुरू असलेल्या ऑनलाइन -ऑफलाइन शिक्षणाचा आपापल्या शाळांचा आढावा तुळशी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन सावंत, माळीवस्ती अरण शाळेच्या उपशिक्षिका श्रीम. वंदना खुने मॅडम तसेच गायकवाड वाडी अरण शाळेचे उपशिक्षक श्री. अभिजीत चवरे यांनी सादर केला.
आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे माननीय हरीश कडू सर यांनी आजच्या शिक्षण परिषदेत ऑनलाईन – ऑफलाइन शिक्षणातून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत मार्गदर्शन करताना प्रथम त्यांनी अरण केंद्राच्या उत्कृष्ट कामाबद्दल गौरवोद्गार काढले. गेली वर्षभर covid-19 च्या प्रादुर्भावाने शाळा बंद आहेत. विद्यार्थी समोर नाहीत मग त्यांचे मूल्यमापन कसे करावे या शिक्षकांच्या मनातील उद्भवलेल्या शंकांवर मार्गदर्शन केले. शासनाने मूल्यमापन शास्त्राची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी २० ऑगस्ट २०१० च्या शासन निर्णयानुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला असल्याचे सांगितले. यामध्ये शिक्षण ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन शासनाने मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल केलेला नाही. हे सांगत असताना मूल्यमापन पद्धतीची आठ साधनतंत्रे वापरावी, त्यांचा भारांश कसा निश्चित करावा व मूल्यमापनासाठी किमान पाच साधन तंत्राचा वापर करावा. या मूल्यमापन पद्धतीमध्ये सर्व अधिकार शिक्षकांना बहाल केले असल्याचे सांगितले. प्रसंगानुरुप प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या रूपांमध्ये शिक्षका समोर प्रकट होत असतो. त्याच्या कलागुणांची आवडीनिवडी ची माहिती माता-पित्यांपेक्षा आपणाला जास्त असते. मूल्यमापन करताना गरजेनुसार वेळ देऊन डे टू डे विद्यार्थ्यांच्या अंतिम प्रगतीविषयी वस्तुनिष्ठ नोंदी असाव्यात. रेडीमेड नोंदी ना छेद द्यावा, विद्यार्थ्यावर अन्याय करणारे मूल्यमापन नसावे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचे दर्शन करणारे मूल्यमापन असावे असे मत व्यक्त केले. अरण केंद्राचा गुणवत्ता पॅटर्न मला जिल्हाभर न्यायचा आहे. या गुणवान शिक्षकांच्या माध्यमातून समर्पक वृत्तीने झोकून देऊन काम करूया. गुणवत्तेचा महाकुंभ सकारात्मक विचाराने पुढे नेऊ या व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे भविष्य उज्वल घडवूया असे ही सांगितले. हे सर्व सांगत असतानाच हरीश कडू सरांनी महाभारतातील द्रोणाचार्याच्या गोष्टीचा दाखला दिला.ही सर्व माहिती देत असताना ही प्रक्रिया एक तर्फी होऊ नये यासाठी सरांनी चर्चात्मक पद्धती अवलंबली. यामध्ये अरण केंद्रातील श्री. सोनवणे ,श्री. राऊत, श्री गोरे, श्रीमती. राडकर मॅडम, श्री. नवनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. श्री. बालाजी ढेंबरे यांनी PGI संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच श्री. संतोष भोरे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व अध्ययन निष्पत्ती यावर मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे यांनी प्रशासकीय कामाचा आढावा घेतला. ऑनलाईन स्वाध्याय सोडवणे, read to me app तसेच covid-19 बाबतच्या नियमांचे पालन करावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझे गाव कोरोना मुक्त गाव, एक भारत श्रेष्ठ भारत तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण याबाबतही मार्गदर्शन केले. श्री. कापसे यांनी सूत्रसंचालन केले व श्री. सोपान मोहिते यांनी अहवाल लेखन व आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button