बोदवड/जळगांव

बोदवड येथे फिरत्या लोक अदालतीचे आयोजन ( फिरती मोबाईल व्हॅन ) व मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर संपन्न

बोदवड येथे फिरत्या लोक अदालतीचे आयोजन ( फिरती मोबाईल व्हॅन ) व मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर  संपन्न….

बोदवड येथे फिरत्या लोक अदालतीचे आयोजन ( फिरती मोबाईल व्हॅन ) व मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर संपन्न

  बोदवड प्रतिनिधी सुरेश कोळी 
 आज बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दुपारी २  वाजता फिरत्या लोक अदालतीचे आयोजन ( फिरती मोबाईल व्हॅन ) बोदवड न्यायालयात  व मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.सदर  कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एस .डी. गरड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती ॲड अर्जुन टी पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ, पोलीस उपनरीक्षक मलचे तसेच पंच अड अर्जून पाटील व अड के एस इगळे  हे उपस्थित होते.
 वृद्धांचे हक्क व अधिकार या विषयावर अड शारदा राऊत यांनी 
तर तृतीय पंथयांचे हक्क व अधिकार या विषयावर अड अर्जून पाटील यांनी मार्गर्शन केले व उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एड.केस इंगळे यांनी केले.
 तर  तृतीय पांथियाना आता सामान्य नागरिकांन प्रमाणे हक्क देण्यात आले आहेत त्यांच्याशी लिगवरून भेदभेद केल्यास दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद आहे. लोकांनी त्यांना आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करावे  असे आवाहन एड.अर्जुन पाटील यांनी लोक अदालतिचे महत्त्व याविषयी मार्गर्शन करतांना केले.
 तर आज झालेल्या  फिरत्या लोक अदालती मंध्ये  ( फिरती मोबाईल व्हॅन ) अदालतीमध्ये एकूण २६ प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी फौजदारी चार व दिवाणी दोन  प्रकरणांमध्ये तडजोड होऊन निकाली काढण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड मोझे,  ऍड आय डी पाटील ,ऍड चंद्रसिंग पाटील, ऍड.विकास शर्मा  ऍड शारदा राऊत ,ऍड सौ तेजस्विनी काटकर , ऍड निलेश लढे,अड. अमोल सिंग पाटील.तसेच न्यायालयीन कर्मचारी वर्ग पोलीस कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर बोदवड व तालुका परिसरातील मोठ्या प्रमाणावर पक्षकार, व नागरिक पोलीस  कर्मचारी  उपस्थित होते.
 फिरत्या लोक अदालतीमध्ये न्यायाधीश गरड ,पंच अर्जून पाटील, एड के.एस इंगळे व वकील व पक्षकार इ.चा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button