जानोरीत हर घर तिरंगा व 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे भारत सरकारच्या वतीने हर घर तिरंगा अभियान दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत गावातील प्रत्येक घरांवर वाड्या वस्त्यांवर नागरिक जेथे जिथे राहत असेल त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने नागरिकांनी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या मार्फत तसेच भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत वितरत करण्यात आलेली राष्ट्रीय ध्वज आपल्या घरोघरी सन्मानाने चढून पूजा करून फडकवण्यात आले 13 तारखेला प्रत्येकाने आपल्या घरोघरी ध्वज उभारले तर ग्रामपंचायत कार्यालय महात्मा फुले विद्यालय व जि प शाळा या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतचे ध्वजारोहण ग्रामविकास अधिकारी केके पवार यांनी केले तर महात्मा फुले विद्यालयाचे ध्वजारोह मुख्याध्यापक श्री निकम सर यांनी केले तर विविध कार्यकारी संस्थेचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव मोहन जमदाडे व जि प शाळा चे ध्वजारोहण स्वातंत्र्यसैनिक शेवकर व काठे यांनी ध्वजाला मानवंदना देऊन केले प्रसंगी महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक स्काऊट गाईड परेड तसेच कुमारी पूजा घुमरे हिने स्वातंत्र्य स्थापन करताना वीर हुतात्मा जवानांचे स्वातंत्र्यासाठी बलिदानाचे महत्त्व सांगितले तर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील देशसेवा केलेले स्वातंत्र्यसैनिक विद्यमान सेवेत असलेले स्वातंत्र् सैनिक जवान तसेच विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे शेतकरी बाबुराव बोस पत्रकार अमोल जाधव आदी मान्यवर शिक्षक शिक्षिका गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला व तिरंग्याचे महत्व पटवण्यात आले आज सायंकाळी ध्वज उतरवल्यानंतर आपल्या घरावर लावलेले ध्वज व्यवस्थितपणे सांभाळावे किंवा ग्रामपंचायतीकडे जमा करावे व ध्वजाचे कुठल्याही प्रकारचे अवमान होणार नाही याची खबरदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी असे आव्हान ग्रामविकास अधिकारी केके पवार व तलाठी तात्या किरण भोये मुख्याध्यापक निकम सर यांनी केले सदर कार्यक्रम सादर करताना गावातील विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी पत्रकार ज्येष्ठ नागरिक देशासाठी बलिदान केलेल्या तिरंग्याला सलाम करण्यासाठी उपस्थित सर्व देश प्रेमी या कार्यक्रमास आनंदाने सहभागी झालेले होते 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या अभियानाच्या काळात ग्रामपंचायतीची इमारत विद्युत रोशनी व तिरंग्याच्या कलरच्या फुलांनी फुलांनी सजवण्यात आली होती गावात विविध देश प्रेमींनी स्वातंत्र्यवीरांचे फलक लावून भारत देशा बद्दल असलेला व तिरंग्याचा स्वाभिमान आनंदाने फडकवत राहील त्या पद्धतीने सर्वांनी भाग घेतला होता






