India

व्हायरल कट्टा सोशल मिडियावर थरकाप उडविणारा चेटकिणीचा व्हिडीओ व्हायरल जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार पहा व्हिडीओ

व्हायरल कट्टा सोशल मिडियावर थरकाप उडविणारा चेटकिणीचा व्हिडीओ व्हायरल जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार पहा व्हिडीओ

मोबाईल, संगणकाच्या ह्या वेगवान जगात आणि सोशल मिडिया वर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. नेटकरी सतत सोशल मिडिया वर काही न काही विचित्र पोस्ट टाकत असतात आणि त्यावर प्रचंड प्रमाणात टिका होते..लोक उत्सुकतेने पहातात देखील.आता तर काय कोरोना च्या काळात भरपूर रिकामा वेळ लोकांना मिळत आहे आणि मग सोशल मिडिया वर नेटकर्यांची धूम असते.

आता सोशल मीडियावर एका चेटकीणीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवातीला कुणालाही थोडीशी भीती वाटेल. मात्र नेमका काय प्रकार आहे हे व्हिडीओ पहिल्या वरच समजेल..ही चेटकीण नसून एक बुजगावणं आहे. पण त्या बुजगावण्याची चेटकीणीप्रमाणे हालचाल पाहता अनेकांचा थरकाप उडतो. तर एका सृजनशील व्यक्तीने पक्षी, कावळ्यांना दूर पळवण्यासाठी ही योजना केली आहे. एका स्प्रिंगला सायकलचं हँडल जोडण्यात आलं आहे. तर हँडलच्या दोन्ही बाजूला बुजगावण्याचे हात बांधण्यात आले आहेत. हे बुजगावणं प्रत्यक्ष जागेवर कल्पना नसताना पाहिलं, तर काळजाचा ठोका चुकेल, हे मात्र नक्की आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत 2 लाख पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडिओ ९ सेकंदाचा असून कप्तान हिंदुस्तान या ट्विटर खातेधारकाने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर कावळे काय?, सर्वांनाच काही भीती वाटत आहे. एखाद्या भयपटातील चेटकीणीसारखा हा व्हिडिओ वाटत आहे. नेटकरी या व्हिडिओला पसंती देत असून वेगावने व्हायरल होत आहे. नेटकरीही या व्हिडिओला आपल्या शैलीत भरपूर कमेंट्स देत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button