Maharashtra

अवैध गौणखनीज करणाऱ्या डंपर व जेसीबीच्या मालकावर केला गुन्हा दाखल. अमळनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची कामगिरी.

अवैध गौणखनीज करणाऱ्या डंपर व जेसीबीच्या मालकावर केला गुन्हा दाखल….
 अमळनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची कामगिरी…..

अवैध गौणखनीज करणाऱ्या डंपर व जेसीबीच्या मालकावर केला गुन्हा दाखल. अमळनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची कामगिरी.

 अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर तालुक्यातील अवैध गौणखनीज वाहतूक करणाऱ्या डंपर व जेसीबीच्या मालकाला अंबाऋषी टेकडीच्या परीसरात रंगेहाथ पकडल्याने अवैध वाहतूक करणाऱ्या मध्ये चांगली दहशतवाद निर्माण झाली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर चांगली दहशत निर्माण झाली आहे.
           आज दिनांक ५/७/२०१९ वार शुक्रवारी सकाळी  तहसीलदार यांनी अंबाऋषी टेकड़ी जवळ कारवाई २ डंपर आणि दोन जेसीबी पकडले आहेत.तहसीलदार देवरे मॅडम यांनी पोलीस व तलाठी बांधवाचे सहकार्य घेऊन अवैध उत्खनन  करणाऱ्या डंपर  व जेसीबीच्या चालकाला रंगेहाथ पकडले असता ते पळून गेले, व त्यांनी वाहनांची इंजीनाची बिघाड करून ठेवले होते व वाहनांची चाबी घेऊन गेले,त्यांनी प्रशासनाला कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य  केले नाही. त्यांच्यावर अवैध गौणखनीज व वाहतुकीचा व सरकारी कामात अडथळा आणला याचा गुन्हा अमळनेर पोलिसात करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button