जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील नियोजन भवन मध्ये जिल्हा शिक्षण समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न
विजय कानडे
आज जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथील नियोजन भवन मध्ये जिल्हा शिक्षण समन्वय समितीची आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा शिक्षण समन्वय समिती मा.नामदार श्री.छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदर बैठकीत नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक माहिती,शाळा, शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच कोरोना संसर्गाच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणाची स्थिती या बाबींचा आढावा घेण्यात आला.बैठकी प्रसंगी कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे *कार्यसम्राट आमदार नितीन अर्जुन पवार* यांनी कळवण सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना नवीन वर्ग खोल्या बांधून देण्यासाठी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली तसेच सुरगाणा तालुक्यात मोबाईल टॉवर बंद स्थितीत असल्याने सगळी टॉवर तात्काळ सुरू करण्याबाबत आग्रही मागणी केली असता पालकमंत्री भुजबळ यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या महिनाभरात सगळे टॉवर सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनास तात्काळ सूचना केल्या.
सदर बैठकीस जि.प.अध्यक्ष मा.ना.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोजताई आहेर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.




