कोरोना बचाव समितीचे भेटीसाठी प्रांताधिकारी यांची अर्धातास प्रतिक्षा
प्रांतसाहेबांनी स्वता संपर्क केला मात्र प्रतिसाद न देता सरपंच नॉट रिचेबल
अर्धातासाच्या प्रतिक्षेत तलाठी, ग्रामसेवक वगळता एकाचीही उपस्थिती नाही.अखेर कोरोना बचाव समितीच्या बेजबाबदारपणा बद्दल नाराजी व्यक्त करीत पुन्हा येणार असल्याचे सांगून निघाले
प्रतिनिधी मुबारक तडवी
मोठा वाघोद्यात कोरोना संक्रमित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे ८जून ला पहिली महिला कोरोना संक्रमित आढळून आली होती मात्र अवघ्या ६ दिवसात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १३ वर येऊन २ पॉझिटिव्ह रुग्ण मयत झालेले असून कोरोनामुक्त मोठा वाघोदा कोरोनाग्रस्त होत हॉटस्पॉट क्षेत्र बनले याच अनुषंगाने फैजपूर उपविभागीय अधिकारी ( कंमांडंट अॉफिसर )डॉ.अजित थोरबोले यांनी आज मोठा वाघोदा येथील प्रतिबंधित क्षेत्र पाहणीसअचानक
भेट दिली असता मोठा वाघोदा कोरोना बचाव समिती नावालाच असल्याचे समक्ष अनुभवले व समितीचे सदस्यांना उपस्थित होण्यास सांगितले मात्र खुद्द फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी कोरोना बचाव समिती अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच यांना संपर्क केला असताना महाशय सरपंच यांचेकडून काही एक प्रतिसाद न मिळाल्याने प्रांताधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली तसेच कोरोना बचाव समितीची अर्धातास वाट बघूनही तलाठी व ग्रामसेवक वगळता एकही सदस्य न फिरकल्याने संताप व्यक्त करीत पुन्हा येतो सांगून निघाले मात्र कोरोना बचाव समिती कागदावरच असल्याचे स्वयं अनुभव घेतल्यानंतर प्रांताधिकारी फैजपूर काय कार्यवाही करतात याकडे गावकर्यांचे लक्ष लागून आहे






