27 महिन्यांच्या चिमुकल्या अक्षन बनसोडेसह 65 जणांनी केले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर सर
नाशिक प्रतिनिधी
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या सह 360 एक्सप्लोरर मार्फत प्रजासत्ताक दिनी जवळपास 65 जणांनी महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाईवर भारताच्या प्रस्तावनेचे वाचन करून विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये होणार असून महाराष्ट्रातील जवळपास६५ लोक 360 एक्सप्लोरर च्या मोहिमेत सहभागी झाले होते.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरमधील जवळपास ३५ लोक या मोहिमेत सहभागी झाले होते. याशिवाय पुणे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, बीड, अहमदनगर, कोकण, लातूर येथून अनेक लोक 360 एक्सप्लोरर च्या मोहिमेत सहभागी झाले होते.२६ जानेवारी रोजी पहाटे बारी या कळसुबाई च्या पायथ्याच्या गावातून सुरवात करून सकाळी ११.३० वाजता टीम 360 एक्सप्लोरर कळसुबाई शिखरावर पोहचली. झेंडावंदन करून भारताच्या संविधानाची प्रस्तावना सामुहिकरित्या वाचण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शाळेत संविधान वाचण्याच्या निर्णयाला यावेळी पाठींबा दर्शवण्यात आला.
सोलापूर मधील चाकोते कुटुंबीय, तावनिया कुटुंबीय, डॉ. सुनील खट्टे, अक्षया बनसोडे, अमित कांबळे, वैभव सिद्धगणेश, पोलीस दलातील संतोष वाघमारे, अमिता वाघमारे, सिद्धराम देशमुख, निलेश शिरूर , सुमित व शुभाष टोणपे, सौरभ जाधव,शुभम साखरे, औरंगाबाद येथील राहुल लीपने, संगमनेर येथील रमेश बनसोडे व बालाजी लोटपुटे, पुणे येथील गणेश व हर्षदा पडवळ,धनंजय क्षीरसागर, नितीन सरोदे, नेहा व स्मिता घुगे, आरती भोसले, महेश वटवटकर, दीपक बोरोटे, रविकांत गायकवाड, आरुष गायकवाड, संग्राम चव्हाण, मिलिंद जाधव, बीड वरून डॉ. चोळे, प्रमोद बोरे, संतोष सुतार, हरिश्चंद्र सोनावणे, धनंजय मुंडे लातूर येथील संजीव रेड्डी, आंतरराष्ट्रीय धावपटू ओमकार स्वामी, विशाल भुजंगा, विशाल नीडवांचे, नंदुरबार येथील गोविंद अगरवाल, नाशिक येथील डॉ. विशाल जाधव, राहुल बनसोडे, नुपूर साळुंके, सिद्धेश, कल्याणी व ज्योती हुलवळे यांनी 360 एक्सप्लोरर च्या मोहिमेत सहभागी होवून विक्रम केला.
360 एक्सप्लोरर मार्फत २६ जानेवारी रोजीच आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून विश्वविक्रम करण्यात आला आहे. साहसी खेळाच्या प्रसारासाठी येत्या काळात 360 एक्सप्लोरर मार्फत अनेक मोहिमा आयोजित करण्यात येणार असून यात सहभागी होण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यामार्फत केले गेले आहे.
27 महिन्यांच्या अक्षन बनसोडे सोबत अनेक चिमुकल्यांची कळसुबाईवर चढाई
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व अक्षया बनसोडे यांचा 27 महिन्यांचा असलेला अक्षन बनसोडे याने 360 एक्सप्लोरर च्या मोहिमेत सहभागी होत कळसुबाई शिखर सर केले आहे. यापूर्वी सिंहगड ट्रेक पूर्ण केला आहे. याशिवाय ६ वर्षाची धृवी पडवळ, आध्या पडवळ, मोनिका तावनिया, श्रेया आचार्य, आर्या आचार्य, यशवर्धन व कृष्णा तावनिया, आरुष गायकवाड, सुमित टोणपे या चिमुकल्यांनी सुद्धा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळसुबाई शिखर सर केले






