Amalner: चोऱ्यांचे सत्र: रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर चोरीस…
अमळनेर रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर चोरुन नेल्याची घटना तालुक्यातील कळमसरे येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, कळमसरे येथील शेतकरी हेमंत
काशिनाथ चौधरी यांचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर हे रोटाव्हेटरसह गावातील रवींद्र कोळी यांच्या घरासमोर दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी लावले होते. दि 1 सप्टेंबर रोजी सकाळी सदर ट्रॅक्टर लावलेल्या जागी मिळाले नाही. आधी परिसरात शोध घेतला पण ते मिळून आले नाही. ट्रॅक्टर चोरी झाल्याची खात्री झाल्याने हेमंत चौधरी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध ४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर चोरुन नेल्याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहे.






