Pune

शेटफळ हवेली येथे पार पडला भव्य नागरी सत्कार..

शेटफळ हवेली येथे पार पडला भव्य नागरी सत्कार..

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे – इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या “संचालकपदी” युवा नेते राजवर्धन हर्षवर्धन पाटील साहेब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ,”राजवर्धन ग्रुप” शेटफळ हवेली यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार तसेच , निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित सचांलक दादासाहेब घोगरे व सौ पुष्पाताई रेडके यांची इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झालेबद्दल जाहीर नागरी सत्कार करण्याता आला या कार्यक्रमास दिपक जाधव, महेंद्र रेडके,इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितीन शिंदे ची प्रमुख उपस्थिती होती , याच कार्यक्रमात राजवर्धन ग्रुपचे सदस्य अविनाश शिंदे, किसन नरबट, दिपक आरडे या गावातील युवकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. व वाढदिवसा निमित्त राजवर्धन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून येथून पुढे प्रत्येक राजवर्धन ग्रुपच्या सदस्यांच्या वाढदिवसाला वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमाचे आयोजन राजवर्धन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व शेटफळ हवेलीचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजवर्धन ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी उपस्थित युवकांना दिपक जाधव,महेंद्र रेडके व संजय शिंदे,हनुमंत अप्पा शिंदे यांनी खुप मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास गावातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक व राजवर्धन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेयशजी नलवडे यांनी केले व सर्वांचे आभार वैभव शिंदे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button