Maharashtra

रन फॉर अमळनेर स्पर्धेत सडावन ची दोन्ही भावंडे ठरलीत विजेता व उपविजेता

रन फॉर अमळनेर स्पर्धेत सडावन ची दोन्ही भावंडे ठरलीत विजेता व उपविजेता

रन फॉर अमळनेर स्पर्धेत सडावन ची दोन्ही भावंडे ठरलीत विजेता व उपविजेता

हजारोच्या संख्येने धावले अमळनेर आणि जिंकले अमळनेर,भिकेशभाऊ युवा मंचतर्फे जोरदार आयोजन,युवांचा प्रचंड प्रतिसाद


अमळनेर-मुलांमध्ये रनिंग ची आवड निर्माण व्हावी,त्यांनी जास्तीत जास्त मैदानी खेळाकडे वळून शरीर सशक्,मजबूत आणि आरोग्यदायी बनवावे यासाठी भिकेशभाऊ युवा मंचच्या वतीने आयोजित रन फॉर अमळनेर या स्पर्धेत सडावन येथील दीपक पाटील व यज्ञेश पाटील ही दोन्ही भावंडे प्रथम आणि द्वितीय विजेता ठरलीत,तर जानवे येथील भूषण पाटील याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले,या स्पर्धेसाठी हजारोच्या संख्येने युवा धावल्याने अमळनेर धावले आणि अमळनेर जिंकले असा प्रत्यय अनेकांना आला.

          काल रविवार दि 23 जून रोजी सकाळी अमळनेर शहरात या स्पर्धेचे आयोजन युवा नेते तथा भाजयुमो तालुकाध्यक्ष व प स चे सदस्य भिकेश पावभा पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.या स्पर्धेला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला सुमारे तीन हजारच्या वर तरुणांनी उस्फूर्तपणे स्पर्धेसाठी नोंदणी केली होती.ऐनवेळी देखील आलेल्या स्पर्धकांना संधी देण्यात आली.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती तर प्रत्येक सहभागी होणाऱ्या स्पर्धकास आयोजकांकडून  मोफत टी शर्ट देण्यात आले.वय वर्षं 14 ते 35 वयोगटातील मुलांसाठी ही स्पर्धा होती,स्पर्धेसाठी काल रविवारी पहाटे पाच वाजेपासून विश्राम गृह येथे मुलाची गर्दी झाली होती या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 11 हजार,दुसरे बक्षीस 7 हजार,व तिसरे बक्षीस 6 हजार असून त्यापुढील 7 विजेत्यांना उत्तेजनार्थ ट्रॉफी ठेवण्यात आली होती.स्पर्धकांची मोठी संख्या व उत्साह पाहून आयोजकांची चांगलीच दमछाक झाली मात्र नियोजनामुळे अडचण आली नाही.माजी आ डॉ बी एस पाटील,कृषिभूषण साहेबराव पाटील,नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी,बजरंगलाल अग्रवाल,शिवसेना शहरप्रमुख प्रताप शिंपी,माजी जि प सदस्य ऍड व्ही आर पाटील,भिकेश पाटील आदीच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेस सुरुवात झाली,सुसाट वेगाने स्पर्धक धावत होते, स्पर्धेचा मार्ग रेस्ट हाऊस महाराणा प्रताप चौकातून नाट्यगृह,उड्डाणपूल,प्रताप कॉलेज,यानंतर क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला,विजेत्यांसह शेकडो विद्यार्थी क्रीडा संकुलापर्यंत धावले.एकसमान टी शर्ट वर धावत असणाऱ्या या हजारो तरुणांनी शहराचे लक्ष वेधले,समारोप स्थळी सर्व सहभागीना एनर्जी ड्रिंक्स देण्यात आले.

            पारितोषिक वितरण माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,मार्केट संचालक पावभा पाटील,माजी जि प सदस्य संदीप पाटील,रेल्वे झेडआरयूसीसी मेंबर प्रितपालसिंग बग्गा,सिनेट सदस्य दिनेश नाईक,प स सदस्य भिकेश पाटील,देखरेख संघाचे सभापती विक्रांत पाटील,ऍड दीपेन परमार,पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,पत्रकार संजय पाटील, महेंद्र रामोशे,जयेश काटे,आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यात प्रथम – दीपक संजय पाटील,सडावंण 11,000/-,द्वितीय- यज्ञेश संजय पाटील सडावण 7000/-व तृतीय -भुषण मुरलीधर पाटील जानवे 6000/-यासह उर्वरित मनोज पांडुरंग शिंगाने,विनोद सुनिल पाटील,गौरव सोमनाथ बागुल,विनय प्रहलाद चौधरी,सागर सुखदेव पाटील,चंदन प्रकाश महाजन,शेखर प्रकाश सोनवणे,शुभम शरद पाटील विजेत्यांना उत्तेजनार्थ म्हणून ट्रॉफी देण्यात आली.सूत्रसंचालन संजय पाटील तर आभार भिकेश पाटील यांनी मानले.बक्षिस वितरणानंतर सर्व स्पर्धकांनी भिकेश पाटील यांना खांद्यावर घेऊन डीजेच्या तालावर ठेका धरला.या स्पर्धेतून उत्साहित होऊन प्रचंड जल्लोष तरुणांनी केला.

          स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक पंकज भावसार,सागर विसपुते ,योगेंद्र बाविस्कर,परेश उदयवाल,तसेच सुरज गोत्राळ, दादू गोसावी,तसेच क्रीडा संयोजक सुनिल वाघ,क्रीडा शिक्षक प्रा अमृत अग्रवाल,संजय पाटील,डी डी पाटील,महेश माळी,एन डी विसपुते,शाम शिंगाने,विनोद पाटील,संजय बोरसे,के यू बागुल,यासह भिकेशभाऊ युवा मंचच्या कार्यकर्तेनी परिश्रम घेतले.

          दरम्यान प्रथमच अशी मोठी स्पर्धा अमळनेरात झाली असून भिकेश पावभा पाटील यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या भिकेशभाऊ युवा मंचने एक वेगळी संधीच मुलांसाठी उपलब्द करून दिल्याने अनेकांनी कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button