Pune

“अंदाज थोडा चुकलाच पाहिजे.” :-स्वातीताई मोराळे

“अंदाज थोडा चुकलाच पाहिजे.” :-स्वातीताई मोराळे

राहुल खरात
NDA 243/UPA 41 हा अंदाज लोकशाही टिकण्यासाठी थोडा चुकलाच पाहिजे. जर असा निकाल आला तर विरोधीपक्ष नेताच नसेल. भाजपा जर 143पर्यंत गेली तर शिवसेनेचे ही महत्व संपेल. रासपला युद्धा अगोदरच अमृत पाजून ठार केले आहे. पडळकरांना जवळ करून महादेव धनगर दुर करून पंकजा मुंडे यांची ताकत, जानकर व ओबीसी यांच्यात फुट पडली आहे. रयत क्रांती खोताला मंत्रिपद मिळाले कि दुसरा नेता पक्षात नाही त्याची मर्यादा संपली.

आठवले यांना मंत्रिपद मिळाले ते आहे तोपर्यंत त्यांचा आवाज निघत नाही. मुखमंत्री व गिरीष महाजन ओबीसी साठी अफूची गोळी आहेत. हळूहळू त्यांना संपवण्यात ही गोळी काम करेल. मुख्यमंत्री शब्द फक्त नाथाभाऊ व पंकजाताई उच्चारु शकत होते. यामुळे नाथाभाऊचें तिकीट कापले आणि ताईंनी 2019साठी तरी मुखमंत्री होण्यासाठी आपल्या इच्छेला मुरड घातली आहे .

लोकशाही, बहुजन समाज, विरोधी पक्ष,छोटे पक्ष टिकून राहणे, शाबूत राहणे, या प्रजाती अस्तित्वात राहणे यासाठी हा अंदाज थोडा चुकलाच पाहिजे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button