Amalner

Amalner: बुद्ध विहार येथे वर्षावास प्रवचन मालिका संपन्न..!भारताचा इतिहास हा बौद्ध धम्म परिवर्तन आणि प्रबोधनाचा इतिहास..प्रा डॉ बी.बी .भालेराव

Amalner: वर्षावास प्रवचन मालिका संपन्न..!भारताचा इतिहास हा बौद्ध धम्म परिवर्तन आणि प्रबोधनाचा इतिहास..प्रा डॉ बी.बी .भालेराव

अमळनेर:-(प्रतिनिधी) सांस्कृतिक बुद्ध विहार’ फरशी रोड अमळनेर येथे ‘वर्षावास’ प्रवचन मालिकेत जगात पूर्वी दोनच संस्कृती होत्या, एक म्हणजे इजिप्त संस्कृती. आणि दुसरं म्हणजे मोहेंजोदडो/ हडप्पा/भारतीय संस्कृती होती. इसवी सन पहिले ते दहावे शतक म्हणजे आज पासून एक हजार वर्षांपूर्वी बौद्ध धम्माची प्रगती अतिशय उच्च कोटीची होती. इथला इतिहास हा बौद्ध धम्माच्या परिवर्तनाचा व प्रबोधनाचा इतिहास मानला जातो. कर्मकांडाचा अज्ञान, अंधश्रद्धेच्या इतिहास नाही. कारण आपण इथल्या श्रमण संस्कृतीचे वारसदार आहोत. असे ते याप्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की बाराव्या शतकात संपूर्ण बौद्ध धम्म लुप्त झाला. या काळात जो भिक्खूंची हत्या करेल त्याला बाराशे सोन्याच्या मोहऱ्या दिल्या जायच्या, त्यामुळे अनेक भिख्खूनी हा प्रांत सोडून इतर प्रांतात निघून गेले. सोळाव्या शतकानंतर इंग्रज भारतात आले, त्यावेळी एकमेव दूरदृष्टीचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे होय. त्यांनी हे ओळखले होते, की आज जरी इंग्रज हे व्यापारी म्हणून आले असले तरी एक ना एक दिवस ते राज्यकर्ते होतील. त्यामुळे इंग्रजां विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी स्वतःचे आरमार निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तीनशे वर्षापर्यंत एकही दूरदृष्टीचा राजा झाला नाही अवघ्या पन्नास वर्षात इंग्रजांनी संपूर्ण भारत काबीज केला. सतराशे पन्नास पर्यंत संपूर्ण भारतात इंग्रज साम्राज्य निर्माण झाले होते. इंग्रज हे मुळातच हुशार, चिकित्सक व अभ्यासू असल्याने त्यांच्या वाचनात असलेले रामायण, महाभारत याचा ५० वर्ष शोध घेतला. परंतु त्यांना त्याचे कुठेही पुरावे आढळून आले नाहीत. मिळाले ते फक्त बौद्ध मूर्ती व बौद्ध विहारे मग त्यांनी आपली दृष्टी बौद्ध धम्माकडे वळवली. तोपर्यंत कोणालाही ‘बौद्ध धम्म’ काय आहे हे माहीत नव्हते. जर इंग्रज भारतात आले नसते तर इथला इतिहास संपूर्ण जगाला कळाला नसता. १५ जानेवारी सन १७८४ मध्ये विलियम जोन्स यांनी ‘एशियाटिक सोसायटी’ची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी उख्खननाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना बौद्धांची मूर्ती व विहारे आढळून आले त्यामुळे विलियम जोन्स हा इंग्रज अधिकारी ‘बौद्ध धम्माच्या’ दृष्टीने महत्त्वाचा प्रचारक मानला जातो. त्यांनी बौद्ध धम्मावर १५ पुस्तके तयार केली या पुस्तकाच्या माध्यमातून इंग्लंड व पाश्चिमात्य देशांना बौद्ध धम्माची खरी ओळख झाली. त्यानंतर १७९९ म्हणजे १८व्या शतकात जेम्स प्रिन्सेफ यांनी सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेखावर कोरलेले पाली भाषेचा अभ्यास करून बौद्ध धम्माचा खरा प्रचार आणि प्रसारक केला. अठराव्या शतकापर्यंत जगाला असे वाटत होते की बुद्ध हे काल्पनिक पात्र आहे वास्तव नाही जेम्स प्रिन्स हा ब्रिटिश अधिकारी बौद्ध धर्माचा पहिला प्रचारक मानला जातो. त्यानंतर १८१९ मध्ये जेम्स स्पीक या इंग्रज अधिकाऱ्याने अजिंठा लेणी शोधून काढली त्यानंतर अलेक्झांडर कलिंगहम यांनी १८३६ मध्ये सारनाथ येथील अशोक स्तंभ शोधून काढले त्यानंतर १८८० बुद्धगया,
साकेत नगरी, तक्षशिला, नालंदा, सारनाथ इत्यादी बौद्ध स्थळ शोधून काढले. १८६१ साली त्यांनी भारतात पुरातत्व विभागाची स्थापना केली त्यामुळे त्यांना संशोधकाचे पितामह म्हटले जाते. त्यानंतर १९०० साव्या शतकात एडमिन ऑरनॉन यांनी ‘द लाईट ऑफ अशिया’ हे बौद्ध जीवन चरित्रावर आधारित पुस्तक लिहिले त्यानंतर डॉ.डेविस व त्यांची पत्नी यांनी देखील लंडनमध्ये पाली भाषेचा अभ्यास करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. १८९१ मध्ये अनागरी धम्मपाल तसेच १८७६ ते १९७२ मध्ये चंद्रमणी महास्थवीर यांनी ऋषीनगर येथे पाली भाषेची पाठशाळा काढली. विजया दशमीच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर १९५६ साली चंद्रमणी महास्थवीर यांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली. विसाव्या शतकातले एक बलाढ्य व्यक्तिमत्व पी.लक्ष्मी नरसु यांनी ‘इसेस ऑफ बुद्धिझम’ हा ग्रंथ 1906 साली लिहिला त्याची तिसरी आवृत्ती बाबासाहेब आंबेडकर यांनी 1948 मध्ये लिहिली त्यावेळी त्यांची अशी इच्छा होती की हा ग्रंथ मी प्रत्येक भारतीयांच्या हातात देईन. शेवटी आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की भगवान गौतम बुद्धांचे कार्य कर्तुत्व तर महान आहेच पण तुम्हा आम्हाला ज्यांनी बुद्धांची ओळख करून दिली ते डॉ. बाबासाहेबांचे कार्य देखील तेवढेच महान आहे. सदर कार्यक्रमाला बापूराव संदानशिव, ज्ञानेश्वर निकम, हरिभाऊ वाघ, सी.एम.नेतकर, प्रविण बैसाणे, संदिप सैंदाणे,अनिल बनसोडे,बबीताताई ताजणे, सोमचंद संदानशिव, बापूराव संदानशिव, विनोद बिऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, इत्यादींनी उपस्थिती दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button