Amalner

अमळनेर: नगरपरिषद हद्दीतील छत्रपती नाटयगृह उद्घाटन कार्यक्रम न घेता अनियमिततेने हस्तांतरण..सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांची तक्रार..

अमळनेर: नगरपरिषद हद्दीतील छत्रपती नाटयगृह उद्घाटन कार्यक्रम
न घेता अनियमिततेने हस्तांतरण..सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांची तक्रार..

अमळनेर शहरात छत्रपती शिवाजी नाटयगृह याचे उद्घाटन समारंभ न करता कुठलाही करारनामा न करता नाटयगृह संबंधीत व्यक्तीस आपण चालविण्यास दिले ही बाब नगरपरिषद नियमाची अनिमियत्ता केल्याचे प्रथम दर्शनि दिसत आहे.
तसेच छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत मानले जाते. त्यांच्या नावारुपाला शोभणारे असे टुमदार नाटयगृह आपण बांधले पण कुठलीही उद्घाटनाची कोणशिला न लावता नाटयगृह हस्तांतरण करणे, एखादया व्यक्तीस भाडे तत्वावर चालविण्यास देणे हा जननायक छत्रपती शिवराय यांचा एक प्रकारे अवमान केल्या सारखे आहे. तरी जर हया गोष्टी अनाधानाने झाल्या असतील तर कृपया यात सुधारणा करावी. तसेच हया घटनेमुळे तमाम शिवभक्तं संताप व्यक्त करत आहे. व अशा प्रकारचा अपमान जाणुन-बुजुन जर केला गेला असेल तर येणाऱ्या काळात छत्रपतीचे अवमान केल्या प्रकरणी समस्त शिवभक्तांकडून प्रचंड मोठे आंदोलन आपण केल्या चुकीच्या विरोधात केले जाईल. यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण झाला तर त्यास नगरपरिषद, अमळनेर सारासार जबाबदार राहील याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

तरी दिलेल्या तक्रारीचे गांभिपूर्वक विचार करत हस्तांतरण ही प्रक्रिया रद्द करावी व अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ उद्घाटन सोहळा घ्यावा, तसेच कोणशिला लावण्यात यावी व ज्यांना कोणास नाटयगृह भाडे तत्वावर हस्तांतरण करावयाचे असले त्यांचा रितसर करारनामा करून घेणे हे आगत्याचे राहील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button