sawada

सावदा ॲंग्लो उर्दू शाळेच्या नविन क्रिडा शिक्षण सेवकाची भरती वादाच्या भोवऱ्यात?

सावदा ॲंग्लो उर्दू शाळेच्या नविन क्रिडा शिक्षण सेवकाची भरती वादाच्या भोवऱ्यात?

“सदर प्रकरणी दि.५/८/२०२२ रोजी कार्यालयीन वेळेत माध्य.शिक्षणाधिकारी डॉ.नितिन बच्छाव यांना हरकत घेणार यांनी भेटून चर्चा केली असता त्यांनी काळे भाऊसाहेब यांना हरकत अर्ज कोणाच्या टेबलावर आहे याची तपासणी करून हरकतदारास त्यांना भेटण्याचे सांगितले.परिणामी सदरील हरकतच्या अनुषंगाने संबंधित कलर्क अमोल यांना सदरच्या क्रिडा शिक्षकच्या मान्यता प्रस्ताव आल्यास प्राप्त हरकत अर्जाचा निपटारा झाल्याशिवाय मंजूरीचा विचार केला जाणार नाही.अशी लेखी टिप्पणीची नोंद करण्याची कारवाई केली जाईल.अशी माहिती यावेळी माध्य. उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांनी दिली.”
—————————————-

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी द्वारे संचालित ॲंग्लो उर्दू हायस्कूल सावदा या शाळेत क्रिडा शिक्षण सेवकची एक अनुदानित जागा दि.२९/६/२०२२ ते आजपावेतोच्या कालावधी दरम्यान भरण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सदरची शिक्षक सेवक भरती विरुद्ध जागृत नागरिक युसूफ शाह सुपडू शाह व पालक शेख फरीद शेख नुरोद्दीन यांनी “शेख रियाज शेख सलीम रा.यावल ता.यावल जि.जळगांव यालच क्रीडा शिक्षक म्हणून घेतले जाईल.याबाब हरकत वजा तक्रार.”या विषयाखाली शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.जळगांव यांच्याकडे मुदतीत रितसर लेखी हरकत वजा तक्रार सादर केलेली होती व आहे.
सदरील हरकत वजा तक्रार मध्ये असे म्हटले आहे की, बी.ए.बी.पी.एड.शैक्षणिक पात्रताचा (क्रीडा शिक्षक)शिक्षण सेवकची एक अनुदानित जागा सदरील शाळेत भरवयाची आहे.अशी जाहिरात दि.२९/६/२०२२ रोजी एका दैनिक वृत्तपत्रात शाळा संबंधितांकडून प्रसिद्ध केलेली आहे.मात्र सदरील अनुदानित जागाची शिक्षक भरती बाबत फक्त कायद्याचा आधार घेऊन औपचारिकता पूर्ती करण्याचा हेतू ठेवून ही जहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.मात्र या अनुदानित जागेवर यावल येथील रहिवासी शेख रियाज शेख सलीम यालच जाहिरात मध्ये नमूद संस्था अध्यक्ष व शाळा समिती चेअरमन वगैरे यांनी मोठ्या आर्थिक लोभापटी आधीच क्रिडा शिक्षक म्हणून घेण्याचे फिक्स करून घेतल्याची खात्री लायक माहिती आहे.तरी सदरील माहिती व प्रकार जर खोटा निघाल्यास आम्ही दोघे तक्रारदारांवर कायदेशीर कठोर कारवाई संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी.नही तर सदरची शिक्षक भरती विरुद्ध केलेली तक्रार अनसार भरती फॅक्सिंग निघाल्यास सदरील शिक्षक भरती तात्काळ रद्द करून सदरचा गंभीर व दखलपात्र प्रकार पुर्वनियोजित कट रचून करणाऱ्या दोषींवर कायदेशीर कठोर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी.अशी ठामपणे मागणी केलेली आहे.व असे न झाल्यास कायदेशीर मार्गाने योग्य त्या पोलिस विभागात किंवा न्यायालयात सदर प्रकरणी दाद मागितली जाईल व यात आपणास सुद्धा सामील केले जाईल अशी जाणीव व सुचना शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.जळगांव यांना देण्यात आली आहे.
तसेच प्रसिद्धीस दिलेली सदरची जाहिरात वाचून मुलाखतीसाठी जिल्ह्यातील सदर शैक्षणिक पात्रताचे इतर गरजू मुलाखती देऊन रिकाम्या हाताने परत जातील व यादरम्यान रस्त्याने ये-जा करत्यावेळी कोणा सोबत दुर्दैवाने काही दुर्घटना वगैरे घडली असती तर यास सदरील जाहिरातच निमित्त ठरली असती अशी शंका सुद्धा हरकत घेणार यांनी जनहिताचा विचार करून उपस्थित केलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button