Nandurbar

कृषी कायद्याच्या विरोधात एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

कृषी कायद्याच्या विरोधात एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

फहीम शेख नंदुरबार

नंदुरबार : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व जन आंदोलनांची संघर्ष समिती तर्फे एक दिवसीय अन्नत्याग आंदोल न
कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या १९ दिवसांपासून कडाक्याची थंडीत दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे लाखो शेतकरी या आंदोलनात सामील आहेत पण आता पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार सकारात्मक नसल्याचे दिसुन येत आहे
त्यामुळे आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय समोर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व जन आंदोलनांची संघर्ष समिती च्या वतीने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आला या मध्ये माजी मंत्री अँड पद्माकर वळवी , डॉ बी आर वळवी , नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा ताई वळवी , कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप नाईक , एम आय एम जिल्हा अध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन तसेच शेकडो शेतकरी आदिवासी महिला पुरुष विविध संघटना व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी भुमिका एम आय एम पक्षाची असुन याच पार्श्वभूमीवर नंदुरबार एम आय एम पक्षातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बेरीस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब व महाराष्ट्रा प्रदेश अध्यक्ष खासदार सैय्यद इम्तियाज जलील साहेब यांचे आदेशान्वय या आंदोलनास जिल्हा प्रमुख सैय्यद रफअत हुसैन यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button