Maharashtra

जिल्ह्यात आधार सिडींगचे काम मोहिम स्तरावर सुरू

जिल्ह्यात आधार सिडींगचे काम मोहिम स्तरावर सुरू

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.25-जिल्ह्यात आधार सिडींगचे काम मोहिम स्तरावर करण्यात येत असून त्यामुळे नागरिकांना ‘वन नेशन वन रेशन’ योजनेचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत अंत्योदय योजनेअंतर्गत 4 लाख 36 हजार 967 तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 5 लाख 90 हजार 935 व्यक्तिंचे आधार सिडींगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

शिधापत्रिका डिजीटायझेशन प्रक्रीयेत आधार सिडींगचे कामही महत्वाचे आहे. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी शिधापत्रिका डिजीटायझेशनबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्रदेखील दिले होते. या कामाला वेग देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात मोहिम स्तरावर हे काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार तालुकास्तरावर या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.

गेल्या तीन महिन्यात अंत्योदय लाभार्थी योजनेअंतर्गत 1946 कुटुंबांचा समावेश करण्यात आला व त्यातील 12 हजार 315 सदस्यांचे आधार सिडींग करण्यात आले असून 4 हजार कुटुंबातील सदस्यांचे आधार सिडींग येत्या काळात पूर्ण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 22 हजार 274 लाभार्थ्यांचा समोवश करण्यात आला आणि याच कालावधीत 6716 शिधापत्रिकेतील 29 हजार 226 सदस्यांचे आधार सिडींग करण्यात आले आहे.

या प्रक्रीयेमुळे अवैध शिधापित्रका किंवा दोन ठिकाणी नोंदणी असल्यास ती ओळखणे सोपे जाणार आहे. शिवाय कुटुंबाला कामानिमित्त स्थलांतर करावे लागल्यास त्याला इतरही राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून धान्य घेणे शक्य होणार आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्यास धान्य घेता येईल. तसेच आधार ओळखीनुसार धान्य वितरण होणार असल्याने गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. शिधापत्रिकेतील सदस्यांचे आधार सिडींग करण्यासाठी नागरिकांनी आपल्या आधार कार्डची माहिती दुकानदार किंवा तलाठी यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकरी महेश शेलार यांनी केले आहे.
0 0 0 0

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button