दिल्लीच्या तख्ता समोर महाराष्ट्र झुकणार नाही. ….
स्वतः जाऊन ईडीच्या कार्यालयात तपास करणार आणि या प्रकरणात सम्पूर्ण सहकार्य करणार -शरद पवार
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ED ने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याचं बोलले जात आहे मात्र ही बाब अद्याप स्पष्ट नाही,परंतु यात आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचं पवारांनी बुधवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. स्वत: शुक्रवारी दुपारी 2 वाजता EDच्या ऑफिसला जाणार, असंल्याचे यावेळी ते म्हणाले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर MRA पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे.
25 हजार कोटींचा हा कथित घोटाळा असल्याचं सुरिंदर अरोरा यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर 2001 मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते.
शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले –
मी पूर्ण सहकार्य करेन. नक्की गुन्हा काय आहे, हे समजून घेतलं पाहिजे. मी निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वेळ देणार आहे. गेल्या आठ-दहा दिवस मी यातच आहे.
मुंबईबाहेर मी जास्त काळ असेन. अशा प्रकारे EDला माझ्याशी काही बोलायचं असेल आणि मी उपलब्ध नसेल तर मी कुठल्या अदृश्य ठिकाणी गेलो, असा त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून शुक्रवारी दुपारी 2 वाजता मुंबईच्या ईडीच्या ऑफिसात जाणार आहे.
माझ्यासंदर्भातील माहिती जी काही आवश्यक असेल ती देईनच. पाहुणचार असेल तोही घेईन. जी चौकशी सुरू आहे, ती करण्याचा त्यांना अधिकार आहे. मी त्यांना पूर्णच सहकार्य करेन. मात्र दिल्लीच्या तख्तसमोर महाराष्ट्र झुकत नाही.
मी महात्मा फुले. राजश्री शाहू आणि आबेंडकरांवर विश्वास ठेवणारा आहे. संविधानावर पूर्ण विश्वास ठेवणारा व्यक्ती. हा माझा सहकार्याचा हात EDला निश्चितपणाने देता येईल.







