Amalner: चोरी झालेली मूर्ती पोलिसांच्या दक्षतेने तात्काळ सापडली..!गावकऱ्यांमध्ये समाधान..!
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पारोळा रोडवर सडावण गावाच्या अलीकडे “मानाचे देवदत्त” असे छोटे मंदिर आहे. दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी या मंदिरातील श्री. दत्त महाराज यांची दगडाची मुख्य मूर्ती चोरी झाली होती. ही माहीती समजताच त्याठिकाणी तात्काळ १० मिनिटांच्या आत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे, PSI श्री. विकास शिरोळे, PSI श्री. नरसिंह वाघ, PSI श्री. अनिल भुसारे, पोलीस अमलदार सुनिल रामदास पाटील,डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रवि पाटील,लक्ष्मीकांत शिंपी, चालक सुनिल पाटील तसेच ठाणे अमलदार ASI बापू साळुंखे, पोशि योगेश बागुल अशांनी सकाळी ६:४५ वाजता स्पॉटवर
पोहोचले. मंदिराचे आताचे व माजी पुजारी यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच पोलीस पाटील श्री. ज्ञानेश्वर पाटील व श्री. महेश जाधव यांच्याकडून देखील माहिती घेतली.
त्यावरून लागलीच पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी पोलीस पथक तयार केले. त्याप्रमाणे तपास पथकाने शोध घेण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने सडावण ते रत्नापिंप्री गावाच्या दरम्यान असलेल्या शेतात चोरीस गेलेली ही मूर्ती मिळून आली. मूर्ती विधिवत ताब्यात घेऊन मंदिरात ठेवली आहे. गावातील लोकांनी व पुजारी यांची
तक्रार नाही म्हणून सांगितले आहे. पोलीसांनी तात्काळ दखल घेतली व श्री. दत्त
महाराज यांची मूर्ती आणली म्हणून गावातील लोकांनी व पुजारी यांची तक्रार नाही म्हणून सांगितले आहे.
पोलीसांनी तात्काळ दखल घेतली व श्री. दत्त महाराज यांची मूर्ती आणली म्हणून गावातील भक्तांनी समाधानी व आनंदी झालेत म्हणून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाप्रती कौतुक केले
श्री. दत्त महाराज यांची मूर्ती ही आज दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री. संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर चे श्री. प्रसाद महाराज हे विधीवत पूजा अर्चना करून मूर्ती स्थापित करणार आहेत.






