Mumbai

बातमी संकलनासाठी सरसकट पत्रकारांना निर्बंधातून सवलत द्यावी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी संकलनासाठी सरसकट पत्रकारांना निर्बंधातून सवलत द्यावी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : बातमी संकलनासाठी सरसकट पत्रकारांना निर्बंधातून सवलत देऊन नवीन आदेश पारित करावा अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपण नुकतेच राज्यात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत यामध्ये आपण प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाला अत्यावश्यक सेवेतून सूट दिली आहे परंतु या आदेशामध्ये डिजिटल मीडियाचा समावेश करण्यात आला नाही माननीय मुख्यमंत्री महोदय केंद्र सरकारने डिजिटल मीडिया बाबत सकारात्मक निर्णय घेत डिजिटल मीडियाला मेन स्ट्रीम मीडियाचा दर्जा देऊ केला आहे. आज आपणही संपूर्ण मंत्रिमंडळाचे वेगवेगळे निर्णय राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल मीडियाचा वापर करीत आहात डिजिटल मिडिया हा सर्वात वेगवान व लवकरात लवकर माहिती व बातम्या देणारा मीडिया आहे. आजच्या घडीला राज्यातील नव्हे तर देशातील बहुसंख्य नागरिक बातम्या पाहण्यासाठी मोबाईलचा जास्त वापर करीत आहेत. मागील वर्षी कोरोना काळात डिजिटल मीडियाने संकट मोठे असतानाही प्रभावीपणे काम केले असून राज्यातील बरेचसे नागरिक या डिजिटल मीडियाचा वाचक व प्रेक्षक वर्ग आहेत तरी आपण लावलेल्या कडक निर्बंधातून डिजिटल मीडिया पत्रकारांना सूट देऊन बातमी संकलन करण्यासाठी परवानगी द्यावी. डिजिटल मीडियाच्या पाठीशी आपण व आपल्या सरकारने उभे राहणे गरजेचे आहे डिजिटल मीडिया व डिजिटल मिडिया पत्रकारांना सूट देऊन तसा नवीन आदेश आपण पारित करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात अशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली असल्याचे जळगांव जिल्हाध्यक्ष रामकृष्ण पाटील(अमळनेर) यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button