Jamner

ना.बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहारची दमदार एन्ट्री!…..तुमचा एक कॉल प्रॉब्लेम स्वालव्ह

ना.बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहारची दमदार एन्ट्री!…..तुमचा एक कॉल प्रॉब्लेम स्वालव्ह

जिल्हा प्रतिनिधी:योगेश पवार

जामनेर तालुक्यातील आमदार ,आरोग्य दूत ,माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन पक्षाने जबाबदारी दिली म्हणून पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीत प्रचारासाठी गेले.यावरून पोटदुखी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बेछुट आरोप करणारी पत्रकार परिषद घेतली !आरोपाचे खंडण करणारी पत्रकार परिषद भाजपाने घेतली ! हा वृत्तांत सर्वच दैनिकांमधून ठळकपणे प्रसिद्ध झाला!उभयतांच्या पत्रकार परिषदा मुद्दा नसलेल्या आहेत .केवळ शाब्दिक गुद्दागुद्दीच्या आहेत .जामनेर तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे.कोरोना पेशंट वाढताहेत.तालुक्यात रोजच्या रोज मृतांचा आकडा वाढतो आहे.रेमिडिसीवरचा तुटवडा आहे.शासकीय कोरोना हॉस्पिटल वगळता सर्वच खाजगी कोविड सेंटर नोटा छापखाने झाले आहेत .यावर कोणीही जिव्हाळ्याने बोलत नाही.भाजपा – राष्ट्रवादी मधील जुगलबंदी म्हणजे तू मारल्यासारखे कृर मी रडल्यासारखे करतो,अशीच आहे.
३० वर्षांपासून जामनेर तालुका हे अनुभवतो आहे.नाटकी राजकारणाला आता लोकंही कंटाळले आहे.आतून कीर्तन वरून तमाशा बंद व्हावा म्हणून आता महाराष्ट्रातील कर्तबगार नेते मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार संघटनेने जामनेर तालुक्यात दमदार एन्ट्री घेतली !कोविड १९ शी संबंधित कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्याचा धडाका प्रहारने सुरू केला आहे.
यामुळे सत्ताधारी आणि विरोधी दोघांच्या उरात धडकी भरायला लागली आहे.
पत्रकारिता आणि संभाजीब्रिगेड संघटनेतील दीर्घ अनुभवी झुंझार कार्यकर्ते मनोजकुमार महाले आणि प्रदीप गायके या जोडगोळीने ग्राऊंड लेव्हलवर प्रत्यक्षात कामाला प्रारंभ केला आहे.
तुमचा एक कॉल!प्राब्लेम सॉल!!अशी हाळी फेसबुक ,व्हॉटस्ॲपवर देऊन कोविड कोरोना रुग्णांना सर्वतोपरी मदत देण्याचे सेवाकार्य सुरू केल्याने लोकांच्या प्रहार संघटनेकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
३५ वर्षांपासून जामनेर तालुक्यातील भोड्याभाबड्या जनतेला वेडे करणारी मशीन भंगारात काढण्याचा चंग प्रहारने बांधला आहे.लवकरच जामनेर तालुक्यातील सर्वच जि.प.गटात दमदार मंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांची जनसंपर्क यात्रा आरंभ होणार आहे.
जामनेर तालुक्यातील राजकारणात राष्ट्रवादी आणि भाजपाची अनेक कार्यक्रमात मिलीभगत आहे.पत्रकार परिषदा घ्यायची आणि तथ्यहिन आरोप करत राहायचे याला आता जनताही कंटाळली आहे.पैसा फेकून तमाशा बघायचे दिवस लवकरच मागे पडतील असा ठाम विश्वास बच्चुभाऊ कडू मित्र संघटनेने व्यक्त केला आहे.
कोरोना महामारीचा विळखा जामनेर तालुक्यात सर्वाधिक असूनही तिकडे दुर्लक्ष करून उटावरून शेळ्या हाकणा-यांना प्रहार संघटना जोरदार तडाखा देण्याच्या तयारीने समाजकारणात उतरली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button