Nashik

मनमाड शहरात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

मनमाड शहरात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक्र : मनमाड येथे भारतीय प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख हा वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत केले आणि पुढे 1950 साली 26 जानेवारी या दिवशी पासुन भारतीय संविधानाला अमलांत आणण्यात आले.
भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता,बंधुता बहाल केली आहेत.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मिती केली. संपूर्ण देशभरात आज 72वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान अंगीकारलं होतं. यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

मनमाड शहरात देखील आज 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रे हायस्कुल , मनमाड शहर पोलीस स्टेशन , उप-विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , मनमाड न्यायालय , मनमाड नगर परिषद , मनमाड रेल्वे स्टेशन , सिनियर रेल्वे इन्स्टिट्यूट मैदान , येथे शासकीय नियमानुसार उपस्थित मान्यवर , अधिकारी ,कर्मचारी आणि शहरातील नागरिक यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन पार पडले.

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पंचशील वाचनालयाच्या आयोजित कार्यक्रमात NCC जवानांनकडुन मानवंदना देण्यात आली. शहरातील स्वामी विवेकानंद फौंडेशन तर्फे आज गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. मनमाड शहर पत्रकार संघ (रजि.) तर्फे उपस्थित मान्यवर आणि पत्रकार संघाच्या सदस्यांकडून भारतीय संविधानाचे पुष्प अर्पण करून पुजन करण्यात आले. पल्लवी मंगल कार्यालय येथे पल्लवी मंगल कार्यालयाचे संचालक श्री आंनद काकडे आणि त्यांच्या कार्यालयातील संपुर्ण सदस्यांकडून भारतमातेचे पुष्प अर्पण करून पुजन करण्यात आले.मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती, मनमाड शहर यांच्या कडुन एकात्मता चौक येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान देणाऱ्या क्रांतिकारक आणि देशासाठी हुतात्मा झालेल्या महापुरुषांचे माहिती सह फलक लावण्यात आलेले होते.सी. आर. एम. एस. कारखाना शाखे तर्फे झेंडा वंदन करून मनमाड शहरातील राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत संविधानाच्या प्रतिकृतिची सन्मान मिरवणूक काढण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button