रावेर

रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समिती मार्फत पुरस्कार वितरण. ..

 रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समिती मार्फत पुरस्कार वितरण. ..

रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समिती मार्फत पुरस्कार वितरण. ..

रावेर प्रतिनिधी विलास ताठे
येथील रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून देण्यात येणारे  शिक्षक आणि शाळा पुरस्कार  जाहीर करण्यात आले आहेत. तालुक्यातील आदर्श शाळा पुरस्कार कुसुंबा येथील  जे. एस.जावळे माध्यमिक विद्यालयास जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेने माध्यमिक शिक्षकांचे पुरस्कार  बंद केल्या पासून या गौरव समितीने  हे पुरस्कार सुरू केले आहेत. तालुक्यातून गोळा झालेल्या सुमारे  दोन लाख रुपये  देणगीच्या व्याजातून दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. शिक्षकांना चांदीचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या शिक्षकांकडून अपेक्षांचे पत्र, शिक्षण तज्ज्ञ व माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांची सप्तपदी, झाडाचे रोपटे,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन  शिक्षकांचा सन्मान केला जातो  तर शाळेला स्मृतिचिन्हही दिले जाते. यावर्षी  पुरस्कार प्रदान कार्यक्रम ८ सप्टेंबरला  कुसुंबा येथील  जे एस जावळे विद्यालयात  होणार आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षक व शाळा पुढीलप्रमाणे– 
शाळा- जे.एस.जावळे विद्यालय,कुसुंबे,ता.रावेर. जि.जळगांव.( मुख्याध्यापक, सुनील तापीराम महाजन, शिक्षक- 
जयश्री संजय कुळकर्णी, पर्यवेक्षिका, सौ कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स हायस्कूल,रावेर.ता. रावेर. 
संजीव पंडित चौधरी,उपशिक्षक, धनाजी नाना विद्यालय,खिरोदा ता. रावेर.
टिकाराम प्रल्हाद बोरोले, उपशिक्षक,न्यू इंग्लिश स्कूल, निंभोरा,ता रावेर. 
अशोक प्रेमसिंग पाटील, उपशिक्षक, महाराष्ट्र विद्या मंदीर, वाघोड,ता रावेर.
गोकुळ बाबुराव भोई, उपशिक्षक, सौ.डी.आर. चौधरी माध्यमिक विद्यालय, निंभोरा,ता. रावेर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button