Maharashtra

कळंब कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या कळंब तालुका भाजपची मागणी

कळंब कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या कळंब तालुका भाजपची मागणी

प्रतिनिधी सलमान मुल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्च 2020 पासून महाराष्ट्र मध्ये कोरोना या साथरोगाने थैमान घातले आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्यातही कोरोना ने धुमाकूळ घातलेला आहे.

ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झालेले आहे त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहे परंतु यास कोविड केअर सेंटरमध्ये सुविधांची वानवा कळंब मध्ये दिसून येत आहे..

त्यामुळे कोविड केअर सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णात ऑक्सिजनची गरज भासल्यास पुढे रेफर करण्याचे प्रकार चालू आहेत गेल्या तीन महिन्यापासून या ठिकाणी ऑक्सीजन लाईनचे काम देखील झालेले नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम केअर फंडातून तालुका स्तरापर्यंत व्हेंटिलेटर चा पुरवठा केला आहे.

परंतु कळंब मध्ये विनावापर पडून आहेत सध्या कळंब शहर व ग्रामीण भागात दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे..

त्याचबरोबर संशयित रुग्णांना ज्या ठिकाणी विलगीकरण यामध्ये ठेवण्यात येते ते त्या ठिकाणी देखील सोयी-सुविधांचा व स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे अशा तक्रारी वारंवार येत आहेत.तसेच कळंब केअर सेंटर मध्ये सहा अतिदक्षता बेड सुरू करावेत.

अशा मागण्यांचे निवेदन कळंबच्या उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांना कळम तालुका भाजपच्या वतीने देण्यात आले व सात दिवसांच्या आत वरील मागण्यांची पूर्तता न केल्यास भारतीय जनता पार्टी कळंब तालुका च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे

या निवेदनावर भाजपचे कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, संदीप बाविकर, माणिक बोंदर,इम्रान मुल्ला आदींच्या सह्या आहेत..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button