Mumbai

?आताची मोठी बातमी..कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या..कधी होतील परीक्षा..?पहा काय म्हणाल्या शिक्षण मंत्री…

?आताची मोठी बातमी..कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या..कधी होतील परीक्षा..?पहा काय म्हणाल्या शिक्षण मंत्री…

कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांशी आज यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य बोर्डाप्रमाणेच इतर बोर्डांनीही निर्णय घ्यावा असंही आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आधी शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या मुलांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आणि वाढते कोरोना रूग्ण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला होता. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आहे. अशात आता कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं काय? असा प्रश्न होता.. त्या प्रश्नाचं उत्तर आता वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

देशात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी गेले अनेक दिवसांपासून केली जात होती.

याच पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक आज घेण्यात आली .ही बैठक शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजीत करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी व बारावीच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिकृत माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

बारावीची परीक्षा मे महिनाच्या अखेरीस तर दहावीच्या विद्यार्थ्यांची जून महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button