Faijpur

फैजपूरात लसीकरण केंद्रासाठी कर्मचारी उपलब्धकरुन दिल्याबद्दल आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश खाचणे यांचे आभार

फैजपूरात लसीकरण केंद्रासाठी कर्मचारी उपलब्धकरुन दिल्याबद्दल आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश खाचणे यांचे आभार
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऐतिहासिक फैजपूर शहरात शासकीय कोवीड लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध करून दिल्याबद्दल येथील प्रसिद्ध आशिर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉ.शैलेश खाचणे यांचा महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते व खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून क़रोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनावर मात करण्यासाठी कोवीड-१९ लस हाच एकमेव पर्याय असल्याचे दिसून येत आहे.अशा परिस्थितीत फैजपूर शहरात देखील लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी करण्यात आली होती.परंतु लसीकरणासाठी आवश्यक कर्मचारी संख्या नसल्याने प्रशासनाने यासंदर्भात हतबलता व्यक्त केली होती.अशा प्रतिकूल परिस्थितीत आशिर्वाद हाॅस्पिटलचे संचालक डॉ.शैलेश खाचणे यांनी त्यांच्या हाॅस्पिटलमधील कर्मचारी शासकीय लसीकरण केंद्रासाठी उपलब्ध करून दिले.यामुळे फैजपूर शहरातील नागरिकांना शहरातच लसीकरण केंद्र कार्यान्वित झाल्यामुळे न्हावी,हिंगोणा किंवा पाडळसे येथे लस घेण्यासाठी जावं लागणार नाहीये.
या त्यांच्या सहकार्याबद्दल समस्त फैजपूर शहरातील नागरिकांच्या वतीने डॉ.खाचणे यांच्या सत्कार करुन आभार व्यक्त करावे या हेतूने खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी सतपंथाचार्य महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांच्या शुभहस्ते हाॅस्पिटलमधे जाऊन डॉ.शैलेश खाचणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, देवेंद्र झोपे, पत्रकार संदिप पाटील, पत्रकार किरण पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button