Pandharpur

लायन्स व लायनेस क्लब मार्फत धान्य देण्यात आले तसेच पिपीई किट वाटप

लायन्स व लायनेस क्लब मार्फत धान्य देण्यात आले तसेच पिपीई किट वाटप

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर
आज आपण पाहतोय कोरोना मुळे आपल्या देशामध्ये खुप मोठी समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डॉक्टर लोक देवदुता प्रमाणे काम करत आहे. नगरपरिषदेच्या दवाखान्यात पिपीई किट कमी असल्याचे समजता लायन्स क्लब पंढरपुर कडुन १५ पिपीई किट उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुजाता गुंडेवार,सदस्य ला.डॉ. प्रवीणा लवटे,ला.ललिता कोळवले, ला.डॉ. दिपाली रेपाळ, ला.सौ वैशाली होटे , डॉ.विवेक गुंडेवार, एडव्होकेट ला.भारत वाघुले व आरोग्य समिती सभापती ला.विवेक परदेशी यांनी १५ पिपीई किट उपलब्ध करून दिले.
पंढरपुर मध्ये लॉकडाउन मुळे बरेचसे बाहेर गावी जाणारे लोक अडकुन आहेत. प्रशासनाचे विशेष आभार अशा लोकांची त्यांनी काही ठराविक ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. समाजातील दान शुर लोकांना व सामाजिक संस्थेने या प्रसंगी गरजुंपर्यंत मदत पोहचवा असे आवाहन करण्यात येत आहे. प्रांत अधिकारी मा.सचीन ढोले साहेब, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,तहसिलदार वाघमारे मैडम हे मदतीसाठी आवाहन करत आहेत.
नागरिंकामधील नेमकी गरज शोधुन त्यांना ते पुरवण्याचे काम लायन्स संस्थेने केले. जेथे गरज आहे तेथे श्रमदान केले, मार्गदर्शन केले, वैद्यकीय मदत, औषध उपचार व सेवा पुरवली. प्रांत अधिकारी सचीनजी ढोले साहेब यांच्या आवाहनाला मदतीची हाक देत लायन्स संस्थेने केंद्रे महाराज मठ येथे दुसऱ्या प्रांतातील अडकलेल्या लोकांसाठी लायन्स क्लब कडून केंद्रे महाराज मठ येथे नागरिकांसाठी शिधा देणात आला.

यामध्ये
*२५० kg. गहू.*
*४९०kg. तांदूळ*
*७५ लिटर गोड़े तेल(खाऊचे तेल)*
*१५० kg साखर*
*१००kg तूर डाळ*
*३० kg ज्वारी*
*०५ kg.चहा पावडर*
*१०kg. लोणचे*
*१०० बॉटल सैनिटाइजर*
*२०० मास्क*
*३क्रेट खरबूज*
*५० डझन केळी*

लायन्स संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे ज्यांना शक्य आहे अशा व्यक्तिंनी गरजु व्यक्तीना ज्यांचे हातावरील पोट आहे अशा गरजुंपर्यंत मदत पोहोचवावी.
सदर प्रसंगी प्रांत अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधीनी लायन्स संस्थेचे आभार मानले. अजुन काही आवश्यकता वाटल्यास निश्चितच आपणास कळवतो असे सांगितले. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी संस्थेचे आभार मानले या कठीण प्रसंगातुन सावरण्यासाठी सर्वांचे हातभार लागल्यास सर्व गरजूपर्यंत आवश्यक ते पोहचेल असे सांगितले. लायन्स संस्थेच्या वतीने विनंती करण्यात आली. शासनाचे आदेश पाळा व डॉक्टर, पोलीस , आरोग्य विभागातील कर्मचारी, शासनाच्या प्रतिनिधींना सहकार्य करा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
संस्थेच्या सेक्रेटरी ला.ललिता कोळवले-जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.अध्यक्षा ला.डॉ. सुजाता गुंडेवार, ला.डॉ. सुधीर आसबे, ला.सुदीप शहा, ला.रा.पा.कटेकर, ला.डॉ.पल्लवी माने, ला.डॉ.अजित गुंडेवार,ला.डॉ.मनोज भायगुडे, ला.राजेन्द्र शिंदे, ला.डी.एन. पैलवान, ला.राजेन्द्र गुप्ता, ला.आरती बसवंती,ला. मंजिरी दाते, ला.शकिलभाई सौदागर, ला.डॉ. स्मिता मेणकूदळे,ला.डॉ. मृणाल गांधी,ला.डॉ. प्रियांका जरे, ला.डॉ. रेखा मोहिते, ला.डॉ संध्या गावड़े,ला.इमरान मुल्ला, ला.मुन्नागिर गोसावी, ला.गुलताज भायाणी, ला.विशालाक्षी पावले, ला.सुरेखा कुलकर्णी, ला.तृप्ती गानमोटे,ला.सरिता गुप्ता, ला.लता गुंडेवार, ला.ललिता कोळवले, ला.स्नेहा गोसावी, ला.गिरिष पाटील,ला.उर्मिला गुंडेवार, रूपा वोहरा,स्मिता अधटराव, अर्चना ताठे देशमुख,सरोज लाड , ला.माधुरी जाधव,ला.कौस्तुभ देशपांडे, ला.बाळासाहेब रणदिवे या सर्व सदस्यांनी संस्थेचा निधी न वापरता स्वतःचे अन्नधान्य देऊन मदत केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button